आर्णी तालुक्यातील चंदन राठोड या समाजसेवी युवक व पत्रकारांच्या आरोग्य सेवा अविरत सुरू असते त्यात आरोग्य शिबिरात तपासणी झाल्यावर मोतिबिंदू अडलेल्या २९ रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली त्यामुळे त्यांना चंदन मुळे नवी दृष्टी मिळाली.
२९ नेत्र रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी
सामाजिक बांधिलकी जोपासून चंदन राठोड, चंद्रकांत बंडे व राजू इंगोले यांनी आयोजित केलेल्या शिबिरातील अबाल वृद्धांच्या नेत्र रुग्णावर यवतमाळ येथील आयुर्वेदिक रुग्णालया मध्ये नेत्र तज्ञ डॉ.मनोज तगलपल्लीवार, डॉ.प्रशांत चव्हाण व डॉ.स्मिता चव्हाण यांनी मोतीबिंदू असलेल्या २९ नेत्र रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. ग्रामीण भागात शिबिराचे आयोजन करून नेत्र रुग्णाची निवड करण्यात आली होती शिबिरा दरम्यान निवड झालेल्या रुग्णाच्या डोळ्याची डॉ.जयंत वाघ यांनी तपासणी केली. दरम्यान यवतमाळ येथील आयुर्वेदिक रुग्णालयात भरती करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेतले.
शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या नेत्र रुग्णाची नेत्रतज्ञ डॉक्टरांनी डोळे तपासणी केले असून यावेळी नेत्र चिकित्सा अधिकारी सुहास कान्हव,संजय अवझाडे, सुनील नागपुरे, स्वप्नील तायडे यांनी नेत्र रुग्णांच्या डोळ्यांचे ड्रेसिंग केले ड्रेसिंग संपल्यानंतर सर्व मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या नेत्र रुग्णांचा सन्मान करण्यात आले यावेळी अबाल वृद्धांना माजी जिल्हाध्यक्ष भाजपा राजेंद्र डांगे यांच्या हस्ते चंदन राठोड चंद्रकांत बंडे रवी ढाकूलकर करमसिंग राठोड प्रद्युम्न राठोड यांनी रुग्णांना दूध, बिस्किट व फळ फ्रूट देवून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
गेल्या वीस वर्षापासून ग्रामीण भागात अबाल वृद्धांकरिता सतत नेत्र शिबिराचे आयोजन करून जिवंत माणसाची सेवा चंदन राठोड, चंद्रकांत बंडे व राजू इंगोले यांच्या कडून घडत आहे यांच्या माध्यमातून मला आपली सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मी माझं भाग्य समजतो असे चांगले कार्य यांच्या हातून घडो यांच्या कार्याला माझा सलाम आहे
राजेंद्र डांगे
माजी जिल्हाध्यक्ष भाजपा यवतमाळ