प्रश्न मतदार संघातील असो की राज्यातील ते सोडवण्यास महा युती सरकार कटिबद्ध आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संवाद साधून दिलासा देत त्याचे प्रश्न समस्यां सुटाव्यात हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो असे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड व्यक्त करतात.
यवतमाळ येथे आल्यावर त्यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात.यवतमाळ येथे जण सेवेसाठी त्यांचे संपर्क कार्यालय आहे.शिवाय मतदारसंघात सुख दुखा च्या प्रसंगी ते धावून जातात.
विविध उपक्रम राबवून सर्वाना मदत करतात सामान्य नागरिक, रुग्ण,शेतकरी, शेतमजूर,याच्याशी संपर्क ठेवत अहोरात्र सेवेसाठी झटणारा आपला जण प्रतिनिधी अशी ओळख संजय भाऊ राठोड यांनी निर्माण केली आहे.
ते जेव्हा मुंबईत शिवनेरी या शासकीय निवासस्थानी असतात तेव्हा राज्यभरातून विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांची भेट घेतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात त्यांच्याशी सविस्तर संवाद साधतात. संबंधित अधिकाऱ्यांना या समस्या तातडीने सोडविण्याचे स्पष्ट निर्देश देखील देतात.