सुरवातीला खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कम बॅक करून अंतिम चार संघात जाण्याचे आपल्या आशा कायम ठेवल्या आहे. रोहित शर्मा हार्दिक पंड्या चांगल्या फार्म मध्ये आहे आक्रमक फलंदाजी व भेदक गोलंदाजी हे अस्त्र मुंबई संघा कडे असून आता एक आनंदाची बातमी समोर येत आहे उर्वरित सामने हे विविध शहरात खेळल्या जातील त्यात एक मुंबई चा सामना दिल्ली सोबत घर च्या मैदानावर म्हणजेच मुंबईत होणार आहे.
आयपीएल २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना येत्या १७ मे पासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील ५८ सामने झाल्यानंतर ही स्पर्धा एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. आता बीसीसीआयने सुधारीत वेळापत्रक जाहीर केलं आहे. स्पर्धेतील उर्वरीत सामन्यांना १७ मे पासून सुरूवात होणार असून स्पर्धेतील फायनलचा सामना ३ जूनला होणार आहे. याआधी ही स्पर्धा ८ शहरांमध्ये खेळवली जात होती. मात्र, आता ही स्पर्धा केवळ ६ शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध घरच्या मैदानावर आपला शेवटचा सामना खेळणार आहे.