महा युती सत्तेत आली ती मुळात लाडकी बहीण योजना राबविल्याने नव्हे तर लाडक्या बहिणींच्या पदरा आड ईव्हीएम घोटाळा करून असा घणाघाती आरोप राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी केली.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिवा शिवा पुरस्कार सोहळ्या निमित्ताने सातारा येथील कार्यकर्ता मेळावा आटोपून कराड येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चांगलाच समाचार घेतला अजित पवार पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांचा पगार ५५ हजार होता आता तो ३ लाखा वर गेला आमदार खासदार यांचे पगार वेळेवर होतात पण दिव्यांगाचे मानधन वेळेवर देण्यात येत नाही वाढवल्या जात नाही असेही ते यावेळी म्हणाले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी आलेले बच्चू कडू पत्रकारांशी बोलत होते. ‘प्रहार जनशक्ती’चे जिल्हाध्यक्ष मनोज माळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मोदी म्हणायचे पाक भारताचे आहे. मग अमेरिकेत जाऊन काय मुजरे घालता. मोदीच स्वतः फसले, मुजरा करायला लागलेत, अशी टीका कडू यांनी केली.
इंदिरा गांधींनी ठरावीक लोकांच्या ताब्यात असलेल्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. तर मोदींनी त्यांचे खासगीकरण केले. मागच्या वेळेस त्यांनी शंभर उद्योगपतींना तब्बल दहा लाख कोटींची कर्जमाफी दिली. या रकमेत देशाचा अर्थसंकल्प दोनदा मांडावा लागेल. याउलट संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना मात्र, केवळ दहा हजार कोटींची कर्जमाफी दिली. मोठ्या कंपन्यांसह बँकांचे खासगीकरण केले. बँकांत लोकांच्या कष्टाची पै- पै जमा असते. परंतु, त्याचे खासगीकरण करण्याचे मोठे पाप मोदींनी केले.