7k Network

गौतम सोबत ५ तास गंभीर चर्चा,नवा कर्णधार कोण यावर मंथन…!

महेंद्रसिंग धोनी नंतर अतिशय संयमित कर्णधार म्हणून धुरा सांभाळनारा रोहित शर्मा इंग्लड दौऱ्या पूर्वी कसोटी क्रिकेट मधून निवृत्त झाल्याने इंग्लंड दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी नवा कर्णधार कोण यावर चर्चा रंगल्या होत्या.हा एक प्रकारचा पेच होता कारण अनुभवी विराट कोहली देखील कसोटी तून निवृत्त झाला आहे म्हणून भडतीय क्रिकेट नियामक मंडळ व भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात प्रदीर्घ पाच तास चर्चा झाली असून कर्णधरा च्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त संस्थेची माहिती आहे.

20 जून रोजी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजला सुरुवात होणार असून आयपीएल संपताच टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लड सिरीज पासून भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या सायकलमध्ये सुरुवात होणार आहे. भारताचा टेस्ट कर्णधार आणि स्टार फलंदाज राहिलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता त्यांच्या जागी कोणत्या खेळाडूंना टीम इंडियात स्थान दिलं जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 23 मे रोजी इंग्लड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात येऊ शकते. मात्र त्यापूर्वी भारतीय टेस्ट संघाच्या नव्या कर्णधाराबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. भारतीय वृत्त संस्थेने दिलेल्या माहिती प्रमाणे शुभमन गिल हा पुढील भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होऊ शकतो. मागील काही दिवसांमध्ये टेस्ट कर्णधार म्हणून गिल सह ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह इत्यादींची नावं चर्चेत होती. पीटीआयच्या माहितीनुसार शुभमन गिल याने भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीर याची दिल्लीमध्ये भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जवळपास 4 ते 5 तास चर्चा झाली. त्यानंतर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर भारतीय टेस्ट संघाचा कर्णधार म्हणून शुभमन गिलच्या नावावर मोहर लावण्याची शक्यता आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!