पाकिस्थानी दहशतवादी हल्ल्यात आपले निरपराध पर्यटक मारले गेले.पाकिस्तान ला धडा शिकवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय विर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबवून दहशदवादाला चोख प्रतिउत्तर दिले.ही यशस्वी कारवाई करतांना आमचे भारतीय काही जवान वीर गती ला प्राप्त झाले ते देश रक्षणासाठी शहीद झाले त्यांचे बलिदान भारतीय नागरिक व देश विसरू शकत नाही असे मत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान, आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यातील कल्ली तांडा येथील शूरवीर जवान मुरली नाईक हे मातृभूमीच्या रक्षणार्थ शहीद झाले. जम्मू-कश्मीरमधील उरी येथे पाकिस्तानी सैन्याच्या भ्याड हल्ल्याला पराक्रमाने प्रत्युत्तर देताना त्यांना वीरमरण आले होते.
त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी ना.संजय भाऊ राठोड त्यांच्या पत्नी सौ. शीतताई राठोड यांच्यासमवेत शहीद जवान मुरली नाईक यांच्या मूळगावी भेट देऊन या शूरवीरास भावपूर्ण श्रद्धांजली त्यांनीअर्पण केली. त्यांच्या आई-वडिलांशी व कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन त्यांनी यावेळी केले.
देश शहीद जवान मुरली नाईक यांचे शौर्य, पराक्रम आणि बलिदान कायम स्मरणात ठेवील आणि त्यांचं जीवनकार्य समाजातील अधिकाधिक तरुणांना देश सेवेसाठी प्रेरणा देत राहील. असेही संजय भाऊ राठोड म्हणाले.
या प्रसंगी कर्नाटकचे माजी मंत्री बाबुराव चव्हाण, शंकर नायक, प्रसिद्ध गायिका मंगली, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यातील अनेक गणमान्य व्यक्ती तसेच स्थानिक तांड्याचे सरपंच, कारभारी, नायक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.