स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या जरी कार्यकर्त्यांच्या असल्या तरी पक्षा साठी महत्वाच्या आहेत.त्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवल्या जाऊ शकतात तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकदिलाने एक जुटीने परिश्रम करावेत असे आवाहन माजी मंत्री व काँग्रेस चे जेष्ठ नेते ऍड शिवाजीराव मोघे यांनी केले. ते काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.
नगर परिषद निवडणुकीकरिता आर्णी काँग्रेसची तयारी सुरू.
आर्णी : आर्णी नगर परिषद क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आर्णी येथील धुमाजी नाईक मंगल कार्यालय येथे रविवारी पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ४ महिन्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर अपेक्षित असलेल्या नगर परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक तालुका व शहर काँग्रेस कमेटी द्वारा आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव मोघे साहेब होते. शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी आवर्जून उपस्थित राहून बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व महत्वाच्या सूचना केल्या. येथून पुढे निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची वाटचाल कशी करावी याबाबत शिवाजीराव मोघे यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार जितेन्द्रभाऊ मोघे, माजी नगराध्यक्ष आरीज बेग मिर्झा, डॉ. रामचरण चव्हाण, राजूभाऊ गावंडे, देवानंद चांदेकर, राहुल मानकर सर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. संघटन मजबूत करण्यासाठी बूथ कमेट्या, वार्ड कमेट्यांच्या नियुक्त्या करण्याची गरज असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. वार्ड निश्चिती व आरक्षणानंतर चित्र स्पष्ट होईल तसेच उमेदवारी, आघाडी याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. सध्या पक्ष म्हणून एकजुटीने कामाला लागले पाहिजे असा सूर वक्ते व उपस्थितांचा होता. सूत्रसंचलन शहराध्यक्ष अमोल मांगुळकर व तुळशीदास मोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन माजी नगरसेवक छोटूभाऊ देशमुख यांनी केले. या बैठकीला तालुकाध्यक्ष सुनील भारती, माजी पं.स. सभापती राजू वीरखेडे, माजी नगर परिषद उपाध्यक्ष कादर इसाणी, उमेश कोठारी, नरेश राठोड, नंदकिशोर राठी,अतुल देशमुख, यासीन नागानी, गफूर शाह, संजय ठाकरे, नाना बंगळे, प्रकाश अंदुरे, जाकिर सोलंकी, अतुल मुनगिनवार, खुशाल ठाकरे, शेख जाफर पेंटर, मकबूल शाह, इस्राईल शेख, पवन बजाज, सैय्यद अय्यूब, अशोक अग्रवाल, जफर पठाण, प्रसेनजीत खंदारे, सिराज बैलीम, श्रीकृष्ण जावळकर, उस्मान गनी, जयराज मुनेश्वर, गजानन सुरटकर, दिलीप चव्हाण,दीपक देवतळे, कुणाल भगत, चिकू सय्यद, सचिन निकडे, अक्रम शाह, अकबर दौला खान, संजय राऊत व इतर उपस्थित होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ करणार शेतकरी पदयात्रा.
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ लवकरच यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून आर्णी तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पदयात्रा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पदयात्रेचे नियोजनासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. लवकरच पक्षातर्फे प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वातील शेतकरी पदयात्रा व सभेची तारीख, स्वरूप इत्यादीबाबत माहिती जाहीर करण्यात येणार असून सर्वांनी तयारी ला लागावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले.