7k Network

भुजबळांना पुन्हा मंत्री पदाचे बळ,जरांगे पाटील नाराज…!

ओबीसी नेते व समता परिषदेचे अद्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना आज पुन्हा एकदा मंत्रिपद देण्यात आले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालेल्या भाजप प्रणित महायुती चे राज्यात सरकार आल्या नंतर स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना आश्चर्यकारकरित्या डावलले होते .त्यामुळे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत भुजबक यांचा बेबनाव असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.छगन भुजबळ हे भारतीय जनता पक्षात  जातील अशाही वावड्या उठल्या होत्या.

मात्र भुजबळ यांची नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना यश आले आणि अखेर आज भुजबळ यांना परत मंत्री करण्यात आले. भुजबळ यांना पुन्हा अन्न व नागरी व अन्न पुरवठा विभाग देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

आज मंत्रिपदाची  भुजबळ यांनी शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. त्यांना अन्न व नागरी पुरवठा खाते देण्यात येणार आहे.

भुजबळ यांना पुन्हा मंत्री केल्यानमराठा आंदोलक मनोज पाटील जरांगे नाराज झाले असून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर टीका केली. विशेष म्हणजे शरद पवार व मनोज पाटील यांनी येवला विधानसभा मतदारसंघात जाऊन भुजबळ यांना पराभूत करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!