यवतमाळ जिख्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय भाऊ राठोड यांनी यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात अनेक नागरिकांचे विविध समस्यांवर निवेदन स्वीकारले व त्यांचे बहुतांश प्रश्न मार्गी लावले.नागरिक अनेक समस्या प्रश्न प्रशासनाकडे मांडतात त्यातील काही ओंन लाईन असतात ते सर्व प्रश्न समस्या निकाली काढा आशा सूचना व निर्देश ना.संजू भाऊ यांनी दिले.
आज यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात नागरिकांच्या विविध समस्या, निवेदने व तातडीच्या अडचणींबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे ऑनलाईन प्राप्त निवेदने त्वरित मार्गी लावण्यासाठी तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश यावेळी ना.संजय भाऊ राठीड यांनी दिले.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, निवासी जिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, कृषी अधीक्षक संतोष डांबरे तसेच महसूल, पाटबंधारे, वन, आरोग्य, पंचायत, महावितरण, मृद व जलसंधारण, पशुसंवर्धन, भूमिअधिलेख आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.