सूर्यकुमार यादव याने वानखेडे स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध चाबूक खेळी केली. सूर्याने ७३ धावा केल्या. सूर्याने यासह इतिहास टी 20 मध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला. जाणून घेऊ या
मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव याने इतिहास घडवला आहे. सूर्यकुमारआधी कोणत्याच भारतीय फलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. सूर्यकुमारने टेम्बा बावुमाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सूर्याला आयपीएल २०२५ मध्ये शतक करता आलं नाही. मात्र सूर्याने सातत्यपूर्ण खेळी करत मोठा कारानामा केला आहे.
सूर्यकुमार यादव एका वर्षात सलग सर्वाधिक वेळा २५ धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. सूर्याने आयपीएलच्या १८ व्या मोसमात (IPL २०२५) खेळलेल्या प्रत्येक सामन्यात किमान २५ धावा केल्या आहेत. सूर्या यासह अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय तर एकूण दुसरा फलंदाज ठरला आहे.