टाळी देऊन एकत्र येण्याची साद आपण उद्धव ठाकरे यांना घातली होती पण तिकडून प्रतिसाद मिळाला नाही असे वक्तव्य काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते.
२०२५ ची विधानसभा निवडणुक मनसे स्वबळावर लढली होती तर शिवसेना महा विकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढली होती.मात्र लोकसभा निवडणुकीत मनसे ने भारतीय जनता पक्षास बिनशर्त पाठिंबा दिला होता.
मराठी लोकांच्या मनात दोन ठाकरे एकत्र यावेत यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. चर्चेची दार आम्ही कधीच बंद केली नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केलं आहे. दोन्ही प्रमुख नेते भेटतील चर्चा करतील आणि ठरवतील. दोन्ही सेनेमध्ये पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतील त्यानुसार पुढे जाऊ असेही अनिल परब म्हणाले. जशा निवडणुका जवळ येतील तसे दोन नेते निर्णय घेतील. मी छोटा नेता आहे. दोघे नेते बसतील आणि ते ठरवतील असे परब म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे की, सगळे वाद बाजूला ठेवून सोबत यायला तयार आहोत. राज ठाकरे यांनी ठरावयाचं आहे आमच्या सोबत एकत्र यायचं की नाही असे अनिल परब म्हणाले. महाराष्ट्र हितासाठी त्यांनी ठरावाव आम्ही चर्चे साठी सकारात्मक आहोत असेही परब म्हणाले.