7k Network

काँग्रेस चे माजी राज्यमंत्री सिध्दराम मेहत्रे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशा वेळी ना.संजय राठोड यांची उवस्थिती..स्वामी समर्थांचे घेतले दर्शन…!

काँग्रेस चे पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस चे बडे बहुजन नेते माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांना शिवसेनेत आणून शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मजबूत केले.काही दिवसा पूर्वी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.संजय  राठोड यांनी सोलापूर जिल्हा दौरा केला होता.

आता अक्कलकोट येथील माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी  शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला

पक्ष प्रवेशा पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व व ना.संजय राठोड यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतले.यावेळी त्यांचा मंदिर सेवा समिती कडून स्वागत करण्यात आले.

शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित शिवसेना मेळाव्याला ना.राठोड उपस्थित राहिले. यावेळी माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

सिध्दाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधु शंकर म्हेत्रे ही राम लक्ष्मणाची जोडी असून म्हेत्रे परिवाराला मोठी सामाजिक पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडिल सातलिंग्गपा म्हेत्रे हे या परिसरातील एक मोठं प्रस्थ होतं. म्हेत्रे परिवाराने कधी जात,धर्म,पक्ष न बघता येथील स्थानिक नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सिध्दारामजी यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. त्यांचे पक्षात स्वागत करून या भागाच्या विकासासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. ते आता शिवसेनेत आल्याने सोलापूर, अक्कलकोट, दुधनीचे भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास याप्रसंगी शिंदे साहेबांनी व्यक्त केला.

या यावेळी ना.संजय भाऊ राठोड यांचे सह विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार राजू खरे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, ज्ञानराज चौगुले, शिवसेना सचिव राम रेपाळे, शिवसेना प्रवक्त्या प्रा.ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख मनिष काळजे, संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, महेश साठे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि अक्कलकोट परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!