आज यवतमाळ येथील लोहारा MIDC परिसरात “जयवंत इंडस्ट्रीज च्या नव्या युनिटच्या भव्य उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहून संवाद साधला. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती, त्यांच्या मार्गदर्शनाने अशा भावना ना.राठोड यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून यवतमाळ जिल्ह्यासाठी हा एक गौरवशाली क्षण ठरला असे मनोगत ना.संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केले.
या नव्या युनिटच्या स्थापनेमुळे यवतमाळ जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळणार असून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. अशा प्रकारचे उपक्रम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जयवंत इंडस्ट्रीजच्या पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला आमदार बाळासाहेब मांगुळकर, नगराध्यक्ष शंकर बडे, शल्यचिकित्सक सौ. वारे मॅडम, डॉ. विजय अग्रवाल, निमा मेडिकल असोसिएशन यवतमाळचे अध्यक्ष राजुभाऊ नागरगोजे, विक्रम नागरगोजे, अभिषेक बांगर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.