उमरी ईजारा येथील मूख्यरस्ता नव्याने करुन दयावा..अश्विनी देशमूख यांची निवेदना व्दारे मागनी
आर्णी ता,9 जूलै… मौजा उमरी इजारा ता,आर्णी येथील मूख्य रस्ता एचपी गँस गोडाऊन ते स्मानभूमी पर्यत नव्याने करुन देण्या बाबतचे निवेदन आज ता,9 जूलै रोजी सामाजिक कार्यकर्त्या अश्वीनी देशमूख सह उमरी ईजारा ग्रामस्थकांनी तहसिलदार,गटविकास अधिकारी,जि,प,बांधकाम उपविभाग,सा,बा,उपविभाग आर्णी,सरपंच सचिव ग्रामपंचायत उमरी ईजारा यांना देवून मागणी केली आहे,
सदर निवेदनात आम्ही उमरी इजारा ता,आर्णी जि,यवतमाळ येथील रहीवासी ग्रामस्थक पावसाळ्यासह बारा महिणे खड्डेमेय रस्तानी ये जा करताना ञस्त झाले असून पावसाळ्यात खड्डे पाण्यानी तूंब भरुन राहत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्येता असून शाळकरी विद्यार्थी वृध्दमंडळी तसेच महिला पूरुषा करिता मागील दहा वर्षापासून मूख्य रस्ताने चालणे म्हणजे काटेवरील कसरत करावी लागत आहे,हिवाळा,उन्हाळ्यात खडयामूळे ञास दायक आहेच तसेच पावसाळ्यात माञ अतिञास दायक मूख्य रस्ता झाला आहे राञीबेराञी एकादया रुग्णास कींवा गरोधर महीलाना उपचारात शहरात घेवून जायचे असल्यास खड्डयामूळे चारचाकी दूचाकी वाहन हातात जीव घेवून चालवा लागत आहे,दर पावसाळ्यात ग्रामपंचायत अंतर्गत खड्डेमेय रस्तावर मूरुम टाकून थातूरमातूर काम केल्या जाते एक पाऊस आल्यावर खड्डे पून्हा तसेच होतात यामूळे कायमस्वरुपी डांबरीकरण कींवा सिमेंट रस्ता तात्काळ बनवून देवून उमरी इजारा ग्रामस्थकाना न्याय दयावा अशी मागणी तहसिलदार तहसिल कार्यालय आर्णी,गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय आर्णी,अभियंता
सा,बा,उपविभाग कार्यालय आर्णी,अभियता जि,प,बांधकाम उपविभाग कार्यालय आर्णी,सरपंच सचिव ग्रामपंचायत उमरी ईजारा यांना निवेदना व्दारे करण्यात आली आहे सदर निवेदन देतावेळी सामाजिक कार्यकर्त्या अश्वीनी देशमूख,संदीप मेश्राम,सतीश दरवई उपस्थीतीत होते
