२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महा युती भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या महा युतीला प्रचंड बहुमत मिळाले तर विरोधक असलेल्या महा विकास आघाडीला ज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा ला केवळ ५० जागा मिळाल्या विरोधक हतबल होतील असे चिन्ह असतांना कोणते ना कोणते मुद्दे आयते विरोधी पक्षाच्या हाती लागत आहेत.
अधिवेशन काळात सर्वात महत्वाचे मानले जाणारे कृषी खात्याचे मंत्री सभागृहात ऑनलाइन रमी चा जुगार खेळत होते हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी समोर आणला व एकच खळबळ उडाली.
कृषी मंत्र्या विषयी प्रचंड प्रमाणात नाराजी दिसून आली ठिकठिकाणी आंदोलने झाली लातूर ला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्या अंगावर छावा संघटनेने पत्ते भिरकावले त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या सूरज चव्हाण ने छावा च्या पदाधिकारी यास बेदम मारहाण केली त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरत असतांना राष्ट्रवादी प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटे यांना अभयदान दिले मात्र रमी पाइ कोकाटेना कृषी खाते डावावर लावावे लागले आता त्यांना क्रीडा व युवक कल्याण हे खाते देण्यात आले.
एक रुपयात पीकविमा म्हणजे शेतकरी भिकारी असे म्हणून वादात सापडलेले कोकाटे नंतर म्हणाले एक रुपया घेतो म्हणजे सरकार भिकारी आहे.वाद आणि कोकाटे हे समीकरण पहायला मिळाले कृषी खाते म्हणजे ओसाड जमिनीचा इजारा असेही ते म्हणाले होते आता तो इजारा काढून घेण्यात आला आहे.ढेकळा चा सर्व्हे करू का म्हणणाऱ्या कोकाटे चा समंध आता शेती व मातीशी येणार नाही.
महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनावेळी सभागृहात लक्षवेधी चालू असताना माणिकराव कोकाटे त्यांच्या बाकावर बसून मोबाइलवर ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्याचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांच्या या व्हिडीओनंतर विरोधकांनी सरकारविरोधात टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर माणिकराव कोकाटे यांना ऑनलाईन रमी खेळणं चांगलंच भोवलं आहे.
माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखातं काढण्यात आलं असून दत्तात्रय भरणे यांच्याकडील क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी आता माणिकराव कोकाटे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे आता कृषीखातं देण्यात आलं आहे. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांचं ‘सभागृहात रमी’ प्रकरण फक्त खातेबदलावर निभावल्यामुळे पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरून आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखातं काढून घेत या खात्याची जबाबदारी आता दतात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आल्यामुळे आता दतात्रय भरणे राज्याचे नवे कृषीमंत्री असणार आहेत. तसेच माणिकराव कोकाटे आता राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री असणार आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने एक्सवर (ट्विटर) दिलं आहे.