शिवसेनेत यवतमाळ जिल्ह्यात ना.संजय भाऊ राठोड यांचे सहकारी व सर्वाना सोबत घेऊन चालणारे मनमिळाऊ मृदू व मितभाषी दुसऱ्या फळीतील नेतृत्व म्हणजे माजी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे
गेल्या २० वर्षांहून अधिक काळ वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना समर्पित राहून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करत आलेले पालकमंत्री ना.संजय भाऊ राठोड यांचे सहकारी श्री. परागभाऊ पिंगळे यांची पश्चिम विदर्भ, प्रभारी विभागीय समन्वयक पदी मा. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते झालेली नियुक्तीकरण्यात आली ही त्यांच्या निष्ठावान कार्यकर्तृत्वाची योग्य पावती आहे, असे ना.संजय भाऊ राठोड म्हणाले.
एका सामान्य शिवसैनिकाला स्वकर्तृत्वाच्या जोरावर मिळालेल्या या जबाबदारीचा मला अभिमान वाटतो.असेही ना.संजय भाऊ राठोड यांनी नमूद केले त्यांचा प्रदीर्घ अनुभव, संघटन कौशल्य आणि कुशल नेतृत्वाने पश्चिम विदर्भात ते शिवसेना पक्ष अधिक बळकट करण्याचे काम नक्कीच समर्थपणे पार पाडतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडी बद्दल त्यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देखील ना.संजय भाऊ राठोड यांनी दिल्या.