आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांनी संघटन वाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील अनेकांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे.
ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्यातील विविध पक्षाच्या वरिष्ठ व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश केला
मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन यवतमाळ जिल्ह्यातील उबाठा गट व काँग्रेससह इतर पक्षाच्या वरिष्ठ व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस ना.संजय भाऊ राठोड यांनी शुभेच्छा दिल्या.
या पक्षप्रवेश सोहळ्याला पश्चिम विदर्भाचे नवनियुक्त प्रभारी विभागीय समन्वयक परागभाऊ पिंगळे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहरभाऊ लिंगणवार, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख श्रीधरकाका मोहोड, चंद्रपूर – यवतमाळ लोकसभा समन्वयक विश्वास नांदेकर, ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उबाठा गटाचे नेरचे माजी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, नेरच्या माजी नगराध्यक्षा सुनीताताई जयस्वाल, नेरच्या माजी नगराध्यक्षा वनिताताई मिसळे नगरसेवक संदीप गायकवाड, नगरसेवक दिलीप मस्के, उबाठा अल्पसंख्यांक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष रिझवान खान, सामाजिक कार्यकर्ते गणेश शीलकावार, नगरसेविका सरिता मनोज सुने, सरपंच विक्रम झाडे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस श्री लोकेश इंगोले, नगरसेविका दर्शना लोकेश इंगोले, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राकेश नेमनवार, पंचायत समितीचे उपसभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष बोडेवार, माजी उपसभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभय डोंगरे, विविध सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास ठाकरे, विविध सहकारी संस्थेचे संचालक राहुल देहणकर, नगरसेवक साजिद शरीफ, उबाठा महागावचे शहर समन्वयक अविनाश देशमुख, भाजपा हेल्थ फाउंडेशनचे तेजेस ठाकरे, उबाठा सवनाचे रुपेश ठाकरे, उबाठा आमनीचे अमोल जाधव (पाटील) महागाव भाजपचे शुभम राठोड, उबाठा आमनीचे निलेश भारती आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.