शाकाहारी जेवणात डाळी सोबत पालेभाज्या देखील खाल्ल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असतात.पालेभाज्या म्हटले की पालक,शेपू,मेथी यांचा उल्लेख करता येतो.
त्यात सर्वाधिक आवडीने खाल्ल्या जाणारी भाजी म्हणजे मेथी ची भाजी.बाजारात लुसलुसित मेथी जुडी दिसली की घेण्याचे मन आवरत नाही.
शेतकरी देखील मोठया प्रमाणात मेथी लागवड करतात योग्य बाजार भाव मिळाला तर मेथी हे पीक शेतकरी बांधवांना परवडणारे आहे कमी कालावधी लागणारे मेथी हे पीक नाजूक असते तोंडा झाल्यावर लवकर ही भाजी सडते व सोकते देखील त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचे नुकसान होते.
ढाबा स्टाईल लसूण मेथी,मेथी फ्राय,घोळणा यासह विविध प्रकारे मेथी ची भाजी सेवन करतात मेथी पराठा हा देखील बनवला जातो. मेथी चा वापर मटण,चिकन यात देखील केल्या जातो.वाळून सुगंधी मेथी जिला कस्तुरी मेथी म्हणतात,मेथी दाणा हा लोणच्यात वापरल्या जातो. आरोग्यासाठी देखील मेथी उपयुक्त आहे.
-
रोगप्रतिकारशक्ती वाढवते:मेथीमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
-
वजन कमी करण्यास मदत करते:मेथीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
-
पचनक्रिया सुधारते:मेथीमध्ये फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्या कमी होतात.
-
रक्तातील साखर नियंत्रित करते:मेथीमध्ये असे घटक असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते.
-
हाडांसाठी फायदेशीर:मेथीमध्ये कॅल्शियम आणि इतर खनिजे असल्यामुळे ती हाडांसाठी चांगली असते.
-
केसांसाठी फायदेशीर:मेथीमध्ये असलेले पोषक घटक केसांच्या वाढीसाठी आणि त्यांना चमकदार बनवण्यासाठी उपयुक्त आहेत.