आर्णी वणी चंद्रपूर च्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना आर्णी तालुक्यातील शेतकरी भेटले व अरुणावती नदी पात्रात प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी केली
त्यावर त्वरित पत्र देऊन यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या सोबत तातडीची बैठक घेऊन नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी केली जिल्हाधिकारी यांनीही त्यांच्या मागणी ची तातडीने दखल घेत पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला दिले अन अखेर पाणी नदी पात्रात सोडण्यात आले.काँग्रेस कडून पाणी सोडल्याचा व्हिडीओ देखील सोशिअल मीडियातून प्रसारित करण्यात आला.
मात्र शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डॉ.विष्णू उकंडे यांनी पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन देऊन कालव्यातून पाणी सोडण्याचे निवेदन दिले होते.पालकमंत्री महोदयांनी तातडीनं फोन लावला पण अजून पाटबंधारे विभागाने कालव्यातून पाणी सोडले नाही.
प्राप्त माहिती नुसार कालच्या च्या डागडुजी ची कामे ठेकेदारा कडून सुरू असल्याचे कळते त्यांना त्रास होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाने काळजी घेतली असून शेतकऱ्यांना मात्र दुर्लक्षित केले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत रोष व्यक्त केल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक वाळून जात आहे.पालकमंत्री आदेश देऊन पाटबंधारे विभागाचे अधिकारी जुमानत नसतील तर प्रशासन ठेकेदारांच्या दावणीला बांधल्या तर गेले नाही ना अशी शंका घेण्यास वाव आहे.