दररोज टीव्ही सुरू केली अन बातम्या चे चॅनल लावले की पाकिस्तान बिथरला,पाकिस्तान घाबरला हे वृत्त पहायला मिळते.
भारताने सिंधू नदी चे पानी रोखले तर काय होईल हे ज्ञान वर्धक कार्यक्रम दररोज पहायला मिळते.पाकिस्तान कडून दररोज शस्त्र संधी चे उल्लंघन केल्याच्या बातम्या दहा दिवस पहायला मिळते.पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्याच्या दुर्दैवी घटनेला ११ दिवस झाले.दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार मध्ये एक जाहीर सभा घेतली तेथून पाकिस्तान ला इशारा देत म्हटले की आता वेळ आली आहे दहशतवादी भूमी नष्ट करण्याची त्यावेळी देशाला वाटले आता काहीतरी मोठी कारवाई पाक विरुद्ध होईल पण तसे काही झाले नाही त्यानंतर ४ बैठका झाल्या उच्चस्तरीय सुरक्षा समिती च्या बैठकीत काही निर्णय होईल अशी अपेक्षा फोल ठरली.
सर्व विरोधी पक्षांनी केंद्र सरकार ला खुला जाहीर पाठींबा दिला.सर्वपक्षीय बैठकीत सुरक्षेत चूक झाल्याचे सरकारने मान्य देखील केले मग त्यास जवाबदार कोण..?दोषी विरुद्ध काय कारवाई करण्यात आली. हे प्रश्न अनुत्तरित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्य दलास कारवाई ची खुली सूट दिल्याने सैन्य दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात मग त्यांनी आदेश का दिला नाही..?पंतप्रधान व राष्ट्रपती यांची बैठक का झाली नाही उलट आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांची पंतप्रधान यांनी भेट घेतली हा मुद्दा विरोधक उपस्थित करत आहेत.मात्र गेल्या ११ दिवसात टीव्ही वर पाकिस्तान घाबरला बिथरला पोकळ धमकी या बातम्या येत आहेत पण कारवाई न झाल्याने भारतीयांच्या मनात चीड आहे तर सोशिअल मीडियातून स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाक विरुद्ध केलेल्या कारवाई ची चर्चा आहे.