7k Network

वृक्ष जगवणारा अवलिया… राजू मते..!

आर्णीत जून २०२४ ला वृक्षलागवड मोहीम आर्णीकर नागरिकांच्या सहकार्याने पार पडली त्यात मुख्यत्वे लिंब पिंपळ वड व फणस झाडे प्रामुख्याने लावण्यात आली. शहरातील अरविंद नगर च्या खुल्या जागेत मला पन्नास झाडांची अबश्यकता आहे असे तेथील रहवासी सामाजिक कार्यकर्ते राजू मते यांनी सनगीतले पण एव्हढ्या मोठया प्रमाणावर झाडांचे संगोपन होईल का हा विचार त्यावेळी आला पण राजू मते यांचा आत्मविश्वास पाहून मग तेथे खड्डे करण्यात आले.

आर्णी चे तहसिलदार वैशाख वाहुरवाघ, वनपरिक्षेत्र अधिकारी वानखडे, सहस्यक पोलीस निरीक्षक मस्के प्रमोद कुदळे मनोज माघाडे हरिओम बघेल व इतरांच्या उवस्थितीत झाडे लावण्यात आले.

दिनांक २७ मे रोजी राजू मते यांचा वाढदिवस होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रमोद कुदळे मनोज माघाडे व परवेज बेग हे गेले तर मते यांच्या घरा समोरील ३  कडूलिंबा चे झाडे डेरेदार वाढलेले दिसले मग ओपन स्पेस मध्ये पाहणी केली असता सर्व वृक्षांची चांगली वाढ झाली होती त्यात पंचवटी फणस कडू लिंब आंबा या झाडांची चांगली वाढ झाली होती.

राजू मते यांनीं नुसतेच झाडे लावली नाही तर ती जगवली देखील त्यासाठी संपूर्ण ओपन स्पेस ला तार कुंपण केले झाडांना ड्रीप ने पाणी दिले या कामी अरविंद नगरातल्या नागरिकांनी त्यांना सहकार्य केले.

या ओपन स्पेस मध्ये एक शिव मंदिर बांधकाम सुरू आहे.बजरंग बली मंदिर आहे भविष्यात एखादा सभासमंडप बांधून येथे गोर गरिबांचे लग्न व्हावे अशी राजू मते याची इच्छा आहे. मंदिरात जर भविष्यात पुजारी ठेवला तर झाडांची निगा व राखण होईल व फळ झाडांच्या उत्पन्न यातून पुजाऱ्यास आर्थिक मदत होईल हा दृष्टीकोन राजू मते डोळ्यासमोर ठेवून वृक्ष संगोपन करतात

येथे लावलेल्या दोन केळी झाडास केळी चे घड लागले असून वृक्ष जगवणार्या राजू मते याचे वृक्ष लागवड व संगोपन समितीने कौतुक केले आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!