प्रतिनिधी शिक्रापूर संदीप ढाकुलकर
*वारकरी दिंडीने बाप्पांचे विसर्जन*
मलठण फाटा शिक्रापूर येथील सह्याद्री
सह्याद्री कॉलनी उत्सव मित्र मंडळ,मलठण फाटा,शिक्रापूर येथील गणपती उत्सव एका अनोख्या पद्दतीने पार पडला.
मलठण फाटा लगतच असलेली सह्याद्री कॉलनी हि प्रसिद्ध उद्योजक सोमनाथ (तात्या)सायकर यांनी वसवलेली छोटीशी कॉलनी आहे.अखंड महाराष्ट्राला साधू-संतांचा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला असतांना संतांचे विचार डोक्यात ठेऊन सह्याद्री कॉलनी येथील सर्व महिला-पुरुषांनी वारकरी संप्रदायिक दिंडीचे आयोजन करुन बाप्पांचे विसर्जन केले.
सह्याद्री कॉलनी मंडळातील आयोजकांनी लहान मुलांना प्रेरणादायी तसेच महिला पुरुषांना एकत्रित आणण्याचे विविध उपक्रम/खेळ आयोजित करुन बाप्पांच्या या दहा दिवसांत खुपच जल्लोष सादर केला. यावेळेस शिक्रापूर गावचे विद्यमान सरपंच मा. रमेश गडदे, सदस्य त्रिनयन कळमकर हे उपस्थित होते.
तसेच आज समाजात अनेक ठिकाणी विविध कर्कश आवाजाच्या सानिध्यात डिजेच्या तालावर थिरकणे चालू असतांना आणी डीजे डॉल्बी वर बंदी घातलेल्या पोलिस प्रशासना च्या आदेशामुळे या आदेशाचे पालन करत सह्याद्री कॉलनीतील टाळ आणि लेझिम सोबत हरिपाठाच्या गजरात वारकरी दिंडीचे विसर्जन हे सर्वांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ डफळ यांनी केले,शुभांगी लोखंडे यांनी आभार प्रदर्शन, तसेच उर्मिला डफळ आणि शिल्पा टोंगसे यांनी लहान मुलांचे विविध उपक्रम घेत कार्यक्रमाचा समारोह केला.
या कार्यक्रमाचे सर्व स्तरा मधून कौतुक करण्यात येत आहे