राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आर्णी शहराध्यक्ष यशस्वी व्यावसायिक सादिक शेख हे प्रसिद्ध तसेच मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व त्यांचे राजकीय व सामाजिक योगदान पहाता आर्णी येथे त्यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गुहा वर साजरा करण्यात आला.
येथे त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
तसेच पत्रकार संघाचे वतीने येथील स्व.मातोश्री सुशीलाबाई नागापुरे वृद्धाश्रमात वृद्धांना फळे बिस्कीट देत केक कापण्यात आला.
यावेळी परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले.
वृद्धाश्रमाचे संचालक समाजसेवक खुशाल नागापुरे यांच्या वतीने सादिक शेख यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. याच वेळी शिवसेना प्रणित किसान सेनेच्या(एकनाथ शिंदे) पश्चिम विदर्भ समनव्यक म्हणून नियुक्ती बद्दल प्रमोद कुदळे यांचाही शाल देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आबीद फानन, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष युनुस शेख,जाफर शेख,नौशाद अली, मनोज माघाडे,जफर खान पठाण, रशीद मलनस, प्रसाद जाधव,पूजा ढाले,जाकीर सोलंकी,परवेज बेग अविनाश गावंडे पाटील खुशाल नागापुरे आदी उपस्थित होते. संचलन जाफर शेख यांनी तर आभार जाकीर सोलंकी यांनी मानले