आंध जमातीने अफवेवर विश्वास ठेवू नये:-डी.बी अंबुरे
• लोणी येथे आदिवासी मार्गदर्शन शिबीर
• आर्णी तालुक्यातील आदिवासी समाजबंधवांची उपस्थिती
आर्णी | प्रतिनिधी
गणेशाची पूजा केल्यास आदिवासींचे आरक्षण धोक्यात येईल,अशी अफ़वा मध्यंतरी सुप्रीम कोर्टाचा हवाला देत,व्हाट्सअँप व इतर सोशल मीडिया वर पसरल्याने,आदिवासी समाजात प्रचंड खळबळ उडाली होती,दरम्यान याचं शंकेचे समाधान व्हावे यासाठी लोणी येथील बिरसा क्रांती दलाचे लक्ष्मण भस्मे यांनी,बिरसा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डी.बी.अंबुरे यांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवार दि.७ सप्टेंबर रोजी लोणी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर सभागृहात करण्यात आले होते,दरम्यान या शिबिराला आर्णी तालुका व तालुक्याबाहेरील हजारो,आदिवासी समाज बांधवानी हजेरी लावली होती.
या सभेमध्ये बिरसा क्रांती दलाचे राज्याचे अध्यक्ष डी.बी अंबुरे यांनी आदिवासी आंध-जमातीला टी .आर. टी .आय .पुणे तर्फे येथील टीम आंध जमातीचे सर्वेक्षण शंका आणि समाधान या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.सर्वेक्षणामुळे आंध आदिवासी जमातीला अनुसूचित जमातिच्या लिस्ट मधून वगळण्यात येईल अशी अफवा समाजामध्ये पसरल्यामुळे हा आंध जमातीसाठी अत्यंत गंभीर विषय होता.परंतु हा जो सर्वे महाराष्ट्र शासन करत आहे तो आदिवासीच्या कला ,संस्कृती ,प्रथा, परंपरा, व त्यांचे आदिम जीवन याविषयीच्या संदर्भाने आहे . आंध आदिवासीच्या संस्कृतीचे जतन व्हावे या संदर्भाने विश्वकोशाच्या धर्तीवर मोठा एखादा ग्रंथ तयार करण्यासाठी हे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे हे सर्वेक्षण कोणत्याही जमातीला लिस्ट मधून वगळण्यासाठी किंवा टाकण्यासाठी नाही या विषयावर अंबुरे यांनी समाजाला मार्गदर्शन करून लोकांच्या शंकांचे समाधान केले.
अनुसूचित जमातीतील एखाद्या उपजातीला यादीमध्ये टाकणे किंवा काढणे हा अधिकार राज्य सरकारला नसून भारतीय संविधानाने संसदेला दिलेला आहे.आंध आदिवासी जमात ही अति प्राचीन जमात असून,अजूनही ही जमात दऱ्याखोऱ्यात वस्ती करून राहत आहे.त्यांच्या प्रथा,परंपरा,संस्कृती,त्यांचे वनस्पती व निसर्गा विषयीचे ज्ञान याविषयी अनेकांना कुतूहल आहे. सण २०१४-१५ ला ४५ जमातीपैकी काही आदिवासी जमातीचे सर्वेक्षण झाले पण त्यापैकी कोणत्याही जमातीला यादीमधून वगळले नाही.किंवा कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. त्यामुळे आदिवासी समाजाने अफवेवर विश्वास ठेवू नये असे मत त्यांनी यावेळी बिरसा क्रांती दलाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डी.बी.अंबुरे यांनी समाजाला प्रबोधन करताना व्यक्त केले.या सभेसाठी उमरखेड ,महागाव,आणि दारव्हा मानोरा ,या तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बिरसा क्रांती दल महिला फोरमच्या राज्य अध्यक्षा गिरजा उईके,लोणीचे उपसरपंच अमोल वारंगे,नारायणराव पिळवंड,संजय मडावी, रमेश भीसनकर,शरद चांदेकर,प्राध्यापक कैलास बोके,शुभम चांदेकर,पुष्पा ससाने,विष्णूजी लसवंते,शंकर पकमोडे,निळकंठ मिरासे,राजेश ससाने, प्रकाश ढगे,बाबाराव होलगरे,सुरेखा दावणे,शारदा वानोळे,शांता अंबुरे,माजी सरपंच सीमा भागवत काळे ,प्रीती फुपरे,कार्यक्रमाच्या यशस्वी साठी बिरसा क्रांती दलाचे लक्ष्मण भस्मे पांडुरंग देवकर ,लक्ष्मण सोयाम, लखन कवटकर ,सतीश बोरचाटे, महादेव पत्रे, प्रकाश शिंदे, नामदेव शेंबाडे, यांनी विशेष प्रयत्न केले.