आर्णी दिनांक 10 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज तहसील कार्यालयावर बंजारा समाजाने एकजुटीने सभा घेऊन जोरदार उपस्थिती दर्शविली हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळावे या मागणीसाठी संपूर्ण आर्णी तालुक्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले
बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सभा घेण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात रॅली काढून तहसील कार्यालयासमोर समाजाच्या विविध गावातील प्रतिनिधींनी व पुढारी नायक कारभारी यांनी आपल्या समाजाला आजपर्यंत एसटी प्रवर्गातून आरक्षण बंजारा समाजाचे हक्काचे असून सुद्धा आजपर्यंत महाराष्ट्रातील बंजारा समाजाला व्हीजीएनटी मधून आरक्षण देऊन एक प्रकारे समाजाची दिशाभूल शासनाने केली आहे याच शेजारील तेलंगणा आंध्र प्रदेश मधील बंजारा समाज यांना एसटी प्रवर्गात आरक्षण आहे
बंजारा समाजाची संपूर्ण राज्यातील वेशभूषा जाती बोलीभाषा एक आहे तर त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील समाजालाही इतर राज्याप्रमाणे एसटी आरक्षण मध्य समाविष्ट करण्यात यावे अशा समाजातील पुढाऱ्यांनी व्यथा मांडल्या व
शासनाने लवकरात लवकर एसटी आरक्षण लागू करावे अशी मागणी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले मागणी पूर्ण न झाल्यास महाराष्ट्रातील संपूर्ण बंजारा समाज येणाऱ्या काही दिवसात आरक्षणासाठी मुंबईला धडकणार अशा इशारा शासनाला देण्यात असून बंजारा समाजाच्या हक्कासाठी पुढेही आवाज उठवला जाईल अशी भूमिका समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केली