आर्णी बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग हा वन्य प्राण्यांसाठी मृत्यू चा सापळा ठरत असून या महा मार्गावरून वाहने सुसाट वेगाने धावतात त्यात जर अचानक जर वन्य प्राणी रस्ता ओलांडत असतांना वन्य प्राणी वाहनांच्या धडकेत मृत्यू मुखी पडतात अशा घटना वारंवार घडत आहेत पण यावर स्थाई समाधान श्यक्य नाही आज दिनांक २८ मे च्या सायंकाळी सहा च्या सुमारास आर्णी पासून नजीक पेंटर बाबा दरगाह समोर एक बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत एक तरुण बिबट्या जागीच ठार झाला. वृत्त प्रकाशित होण्या पर्यंत वनविभागाची चमू येथे आली नव्हती.
