आर्णी शहरातील गांधीनगर उर्दू शाळेच्या समोर रस्त्यावर खड्डे पडले असून यात एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे पाहून आर्णीतीळ एम आय एम आक्रमक झाला असून हे खड्डे न बुजवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अगदी गेट समोरच खड्डे आम्हाला दिसले प्रशासनाला दिसत नसतील का? असा प्रश्न त्यांनी प्रशासनास विचारला आहे. एखादा अपघात झाल्यावर प्रशासन जागे होईल का? 2 दिवसात रस्ता दुरुस्त ना झाल्यास विध्यार्थी व पालकांसह MIM डबक्यात बसून आंदोलन करेल. असा इशारा
अली खान प्रवक्ते MIM आर्णी तालुका यांनी दिला आहे.