खेळ,उद्योग किंवा राजकारण असो विदेशी जमिनीवर जर भारतीय वंशाच्या व्यक्ती कुठलाही पराक्रम करत असेल यश मिळत असेल तर त्याचा आनंद भारतियांना होणे स्वाभाविक आहे.काही महिन्यांपूर्वी इंग्लंड चे पंतप्रधान ऋषी सूनक झाल्याचा आनंद आपल्या इथे साजरा केला होता.
भारतीय वंशाच्या रचिन रवींद्रने 48 वर्षांच्या इतिहासात पदार्पणाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. रचिनने ९ सामन्यात ७०.६३च्या सरासरीने ५६५ धावा केल्या आहेत. या कालावधीत रचिनने २ अर्धशतके आणि ३ शतके झळकावली आहेत. या विश्वचषकात रचिन रवींद्रपेक्षा जास्त धावा कोणत्याही फलंदाजाला करता आलेल्या नाहीत. एवढेच नाही तर २५ वर्षांखालील विश्वचषक खेळताना सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही रचिन रवींद्रने मोडला आहे. सचिन तेंडुलकरने १९९६ च्या विश्वचषकात ५२३ धावा केल्या होत्या.
रचिनचे नाव त्याच्या वडिलांनी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावरून ठेवले होते. रचिन रवींद्रचे वडील दोन्ही भारतीय खेळाडूंचे मोठे चाहते होते. रचिन रवींद्रने २०१९ चा विश्वचषक बंगळुरू येथील त्याच्या घरी बसून पाहिला. जेव्हा रचिनला वाटले की भारतात क्षमता आहे, तेव्हा तो न्यूझीलंडला गेला आणि आज विश्वचषकातील सर्वात तेजस्वी तारा बनला आहे. पदार्पणाच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्याबद्दल भारतीय वंशाचाम्हणून बोल महाराष्ट्र च्या वतीने त्याचे अभिनंदन.