विश्वकप स्पर्धेत हार पत्करणारी भारतीय टीम ने पहिल्याच सामन्यांत आष्ट्रेलिया चा पराभव करून त्या पराभव चा वचपा काढला.
,पहिला T20 सामना थेट स्कोअर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेला विजयासह चांगली सुरुवात केली आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवारी (२३ नोव्हेंबर) विशाखापट्टणम येथे खेळला गेला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या सामन्यात कांगारू संघाचा २ गडी राखून पराभव केला.
रिकू सिंग ने षटकार ठोकत केला विजयावर शिक्कामोर्तब
या सामन्यात कांगारू संघाने २०९धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने अवघ्या २२धावांत ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैस्वाल या दोन्ही सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. यानंतर सूर्याने कर्णधारपदाची खेळी खेळली आणि इशान किशनच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ६०चेंडूत ११२धावांची भागीदारी केली.