सोशल मिडीया च्या माध्यमातून पळसा येथील अंगणवाडी चा कायापालट
सवीता निमडगे यांच्या आवाहनाला सत्तर दानशूर व्यक्तीचा प्रतिसाद
हदगांव: भगवान कदम
बरडशेवाळा सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक पालक आपल्या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करीत असून दिवसेंदिवस शहरी भागासह ग्रामीण भागात इंग्लिश मीडियम स्कूल खाजगी शाळा च्या माध्यमातून शिक्षणावर खर्च करण्याची चढाओढ बघायला मिळत आहे. प्राथमिक शिक्षणाची सुरुवात अंगणवाडी पासून सुरु होते. बालकांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार हदगांव तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी उमेश मुदखेडे यांनी पुढाकार घेत तालुक्यातील अंगणवाडी केंद्र डिजीटल करण्यासाठी केलेल्या आवाहनाला अनेक गावात काही ठिकाणी ग्रामपंचायतीने तर अनेक ठिकाणी शिक्षण प्रेमी सह दानशूर व्यक्ती लोकसहभागातून प्रतिसाद मिळाल्याने अनेक अंगणवाडी केंद्र डिजीटल झाली आहेत.
पळसा ता.हदगांव येथे पाच अंगणवाडी केंद्र आहेत.त्यापैकी दोन वर्षापुर्वी नव्यानेच बांधकाम केलेल्या केंद्र एक इमारत बोलकी व सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी सिडीपीओ उमेश मुदखेडे यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्त्या सवीता विनोद निमडगे यांनी हदगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सामाजिक राजकीय धार्मिक दानशूर क्षेत्रातील सातशेहुन सदस्य असलेल्या सोशल मिडीया ग्रुपवरुन मागील चार वर्षांपासून गरजु कुटुंबासाठी विविध प्रकारे मदती सह अनेक विषय मार्गी लावून खात्रीशीर माहीतीची ओळख निर्माण करीत अनेक अडी अडचणी सोडवुन उपयोगी कार्याने परीचीत असलेल्या ग्रुप सह सोशल मिडीया वर केलेल्या आवाहनाला सत्तर दानशूर व्यक्तीकडुन मिळालेल्या प्रतिसादातुन जवळपास सत्तर हजार रुपये आर्थिक मदत झाली. त्या मदतीतुन नफा न तोटा या तत्वावर गरजेनुसार आवश्यक कामे केल्याने अंगणवाडीचा कायापालट झाला असून या योगदानातुन अंगणवाडी डिजीटल झाली आहे.
सध्याची शैक्षणिक परीस्थीती लक्षात घेता डिजीटल शिक्षण ही काळाची गरज आहे. मी नव्यानेच बांधकाम केलेली अंगणवाडी डिजीटल करण्यासाठी सोशल मिडीयावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याने मी अंगणवाडी डिजीटल करु शकलो. याकामी योगदान देणा-या सर्व दानशूर व्यक्तीचे व प्रशासनाने या प्रेरणादायी उपक्रमाचे कौतुक करुन अंगणवाडीतील उदघाटन व सन्मान सोहळा कार्यक्रमास वेळ देणार असल्याचे सांगीतले असल्याने त्यांची आभारी आहे.
सवीताताई विनोद निमडगे सामाजिक कार्यकर्त्या
ग्रामीण भागातुन शैक्षणिक सुविधेसाठी घेतलेल्या पुढाकाराला सोशल मिडीयाच्या माध्यमातून दानशूर दात्यानी केलेली मदत गौरवास्पद आहे.हा प्रेरणादायी उपक्रम ईतर गावातील अंगणवाडी शाळा डिजीटल करण्यासाठी आदर्श घेण्याची गरज आहे. या प्रेरणादायी उपक्रम तालुका जिल्हा प्रशासनासाठी दखल घेणारा ठरला आहे.असे
तहसीलदार विनोद गुडंमवार यांनी म्हटले आहे.