7k Network

बनारस च्या त्या घटने बद्दल भाजपने स्पष्टीकरण द्यावे:सुप्रिया श्रीनेत

सर्वत्र रॅम मंदिराचा डंका वाजविणार्या भाजप ने बनारस विश्व हिंदू विश्व विद्यालयात घडलेल्या घटने बद्दल बोलावे या घटनेत अरिपी हे भाजपचे आय टी सेल चे प्रमुख पदाधिकारी आहेत त्या क्रूर घटने नंतर मध्यप्रदेश राज्यात आरोपींने प्रचार देखील केला यावर भाजप का गप्प बसून आहे असा सवाल करून काँग्रेस च्या फायरब्रँड प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी भाजप वर आरोपाच्या फैरी झाडल्या.
गेल्या महिन्यात आयआयटी-बीएचयूच्या विद्यार्थिनीसोबत सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. या घटनेनंतर मोठा गदारोळ माजला होता. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना आरोपींना पकडता आले नाही. शनिवारी पोलिसांनी या आरोपींना अटक केली. हे मोठे यश असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

नोव्हेंबरच्या सुरुवातीला आयआयटी बीएचयूमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग झाला होता. मित्रासोबत जाणाऱ्या तरुणीला तीन तरुणांनी अडवून तिचा विनयभंग केला आणि व्हिडिओही बनवला. या घटनेच्या निषेधार्थ अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत विद्यार्थी कॅम्पसमध्ये बॅनर, पोस्टर घेऊन निदर्शने करत होते.

आता वाराणसी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. कुणाल पांडे, आनंद उर्फ ​​अभिषेक चौहान आणि सक्षम पटेल यांना वाराणसी पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांवर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर त्याचे चित्रही समोर आले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त केली आहे.
आता या प्रकरणात अजून काय समोर येते हे पाहणे गरजेचे आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!