7k Network

ममता बाल सदन कुंभारवळण येथे बाल आनंद मेळाव्याचे थाटात उदघाटन

प्रतिनिधी संदीप ढाकुलकर ममता बाल सदन कुंभारवळण येथे बाल आनंद मेळाव्याचे थाटात उदघाटन

अनाथांची माई जेष्ठ समाज सेविका पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांनी समाजामध्ये संवेदनशीलता जागृत करण्याचे कार्य केले आहे. अनाथ लेकरांसाठी त्या ममातारूपी मायेचा आणि प्रेमाचा सागर होत्या. त्यांनी गोर गरीब अनाथ निराधार, निराश्रित लेकरांना जीवनदान देण्याचे कार्य केले. त्यांनी सुरु केलेले हे पावन कार्य थांबू देऊ नका असे प्रतिपादन बाल आनंद मेळाव्याचे मुख्य अतिथी भारताचे १४ वे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविन्द यांनी केले.
पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन कुंभारवळण येथील अनाथ आश्रमात आयोजित बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन भारताचे १४ वे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते थाटात पार पडले. यावेळी ते मेळाव्यात उदघाटन प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममता बाल सदन संस्थेचे अध्यक्ष बाल मेळाव्याचे आयोजक दिपक दादा गायकवाड हे होते. ते बोलतांना पुढे म्हणाले कि, बच्चे मन के सच्चे हे गीत मला आवडलं होत. चिमुकली मुले हि देवाचा अवतार असतात. तुम्हाला जर ईश्वरीय रूप पाहायचं असेल तर या चिमुकल्यांमध्ये बघा, ईश्वराला देखील ते आवडतात. ज्याचं कोणी नसते त्यांचा देव असतो. माईंनी हजारोंना आश्रय दिला, त्यांचे पालन-पोषण आणि संगोपन केले हि खूप मोठी गोष्ट आहे.
माझा दोनवेळा माईंशी संबंध आला. २०१७ मध्ये नारी शक्ती आणि २०२१ मध्ये पद्मश्री असे दोन सर्वोच्च पुरस्कार देऊन मी त्यांच्या कार्याचा गौरव केला हि माझ्यासाठी देखील अभिमानाची गोष्ट आहे. माईंनी मला दोन वेळा माझ्या संस्थेला भेट द्या अशी विनंती केली होती. परंतु राष्ट्रपती पदावर काम करीत असतांना राजशिष्ट्राचार मुळे अनेक ठिकाणी जाणे शक्य होत नाही. जायचे असेल तर अनेक अडचणी येतात. त्याचा सामान्य लोकांना त्रास होतो याची जाणीव मला होती. तेव्हा त्यावेळी माईंच्या संस्थेला भेट देणे मला शक्य झाले नाही. परंतु आपण आयोजित केलेल्या या बाल मेळाव्यात माईंच्या सर्व संस्थेतील मुला-मुलींना भेटण्याचा योग आला. माझ्या समोर बसलेल्या चिमुकल्यांना बघून मला आनंद होतो आहे अशी कबुली श्री. राम नाथ कोविन्द यांनी दिली. ममता बाल सदन संस्थेचे अध्यक्ष दिपक दादा आपण शिक्षण घेऊ शकले नाहीत परंतु आपण मागील ४६ वर्षांपासून माईंच्या सोबत कार्य करीत होतात आज ही आपण माईंच्या समाज सेवेचा वारसा पुढे घेऊन जात आहात हे बघून मला खऱ्या अर्थाने समाधान वाटते. माईंनी कधीच हार मानली नाही. त्यांचा संघर्ष कायम सुरुच होता त्यांच्या आकस्मिक निधनामुळे समाजाची हानी झाली असून माईंच्या मात्या-पित्यांना मी नमन करतो अशी भावना श्री. राम नाथ कोविन्द यांनी व्यक्त केली. ममता बाल सदन मधील कु. जान्हवी सिंधुताई सपकाळ हिने मनोगत व्यक्त करतांना “लकीर कि फकीर हू मै, उसका कोई गम नही। नही धन तो क्या हुवा, इज्जत तो मेरी कमी नही मै।।” शेर सादर केला. आणि तिने मनोगतातून आयएएस अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली. हि गोष्ट श्री. राम नाथ कोविन्द यांना खूपच आवडली. त्यामुळे त्यांनी भाषण सुरु असतांना कु. जान्हवीने सांगितलेला शेर म्हणत तीला मंचावर बोलावून जवळ उभे केले. या चिमुकली सोबत माझे फोटो काढा अशी सूचना श्री. राम नाथ कोविन्द यांनी छायाचित्रकारांना केली. त्याला प्रतिसाद देत छायाचित्रकारांनीं देखील फोटो शूट केलेत तोवर संपूर्ण मेळाव्यात चिमुकल्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड यांनी अध्यक्षीय भाषणातून माईंच्या सर्व संस्थांचा गोषवारा समोर ठेऊन बाल आंनंद मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. मंचावर सन्मती बाल निकेतनच्या ममता सपकाळ, सावित्रीबाई फुले वसतिगृहाचे अरूणभाऊ सपकाळ, आमदार संजय जगताप, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे रोहित शिंदे उपस्थित होते. बाल आनंद मेळाव्याचे प्रास्ताविक अधीक्षिका स्मिता पानसरे तर सूत्र संचालन जनसंपर्क अधिकारी मुकेश चौधरी व मिनल सिंधुताई सपकाळ यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात आणि समारोप राष्ट्रगीताने झाली. बाल मेळाव्याला ३ वर्षाच्या चिमुकल्यांपासून ७५ वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्ती देखील उपस्थित होत्या. बाल मेळाव्याच्या आयोजनाकरिता पद्मश्री. डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ माई परिवार, सावित्रीबाई फुले मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह चिखलदरा, ममता बाल सदन कुंभारवळण, सन्मती बाल निकेतन मांजरी बु. मनःशांती छात्रालय शिरूरच्या सर्व कर्मचारी वृंदांनी अहोरात्र परिश्रम घेतले. मेळाव्यात माईंच्या सर्व लेकरांनी ५ मोठे उंट सफारीसाठी , ४ घोडेस्वारी, आकाश पाळणा मोठा आणि छोटा, जंपिंग जपांग, वॉटर कार, घोडागाडी, झुकझुक आगीनगाडी, राहाटगाडगे, मिकी माउस, ट्रॅक ट्रेन, बलून फोडण्याची गण शूटिंग, गुड्डीका बाल, उसाचा रस, पॉप कॉर्न, आईसक्रीम या सारख्या विविध खेळणी व उपक्रमांचा भरभरून आनंद लुटला. अडीचशे मुलांच्या उपस्थितीत मुख्य श्री. राम नाथ कोविन्द यांच्या हस्ते आकाशात हायड्रोजन बलून सोडून मेळाव्याला सुरुवात करण्यात आली.
माझ्यासमोर बसलेल्या चिमुकल्यांनो तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप मोठे होण्यासाठी स्वप्न बघायचे असेल तर राष्ट्रपती होण्याचे स्वप्न बघितले पाहिजे. त्याच कारण कि राष्ट्रपती हे शेवटचे पद आहे, या पदाच्या पुढे दुसरे कुठलेही पद मोठे नाही. माणसाचे स्वप्न कधीच संपत नाहीत. कुणाला आमदार व्हावं वाटत, आमदारांना खासदार व्हावेसे वाटते, खासदारांना मुख्यमंत्री व्हावं असं वाटते, मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्री व्हावं असे वाटते. पण मला आता माझी कुठलीही दुसरे स्वप्न नाहीत कारण राष्ट्रपती च्या पुढे कुठले पद नाही. मला कल्पना नाही कि, मी या पदासाठी पात्र होतो कि नाही, पण मी या देशाचा राष्ट्रपती झालो. माझी देखील परिस्थिती सामान्य होती. पण माझी इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास दृढ होता. तुम्ही अशी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करा, प्रेरणेसाठी माझा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहील, चिंता करू नका, असे म्हणत त्यांनी चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले.
मी ममता बाल सदनचे आभार मानतो की त्यांनी अतिशय सुंदर असा बाल आनंद मेळावा आयोजित केला. माईंच्या सर्व संस्थेची मुलं आणि मुली एकत्र आलीत याचा हि मला आनंद आहे. बौद्धिक क्षमता निर्माण करण्यासाठी असे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे गरजेचे असून ममता बाल सदन आणि आयोजक दिपक दादा गायकवाड यांचे आभार मानतो. आज आपल्या समाजात मुलांची यशस्वीपणे जडण-घडण करायची असेल तर त्यांना योग्य त्या वयात आणि योग्य ठिकाणी प्लॅटफॉर्म देणे काळाची गरज आहे. तेव्हाच त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळेल. त्यांच्यातील दडलेले कला कौश्यल्य समोर आले पाहिजे. जेव्हा असं होईल तेव्हा ते आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होतील याचा मला विश्वास आहे असे मत श्री. राम नाथ कोविन्द यांनी बाल मेळाव्यात मांडले.

ममता बाल सदन कुंभारवळण संस्थेत आयोजित बाल आनंद महोत्सवात मुख्य अतिथी म्हणून भारताचे १४ वे राष्ट्रपती श्री. राम नाथ कोविन्द चिमुकल्यामंध्ये रमले. मुलांनी सादर केलेल्या अभिनय त्यांनी मन लावून बघितला. शेवटी भाषणातून त्यांनी मी माझ्या कडून सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन संस्थेला ५ लाख रुपयाची मदत करतो अशी घोषणा केली. हि छोटीशी मदत वैयक्तीक माझ्या कडून असेल, असे हि त्यांनी सांगितले. त्यावर सभामंडपात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!