देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून ३ राज्यात मिळालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप ला चांगले यश मिळाले असल्याने एन. डी.ए. मध्ये उत्साहाचे वातावरण असून तेलंगाणा राज्यात मिळालेल्या यशामुळे काँग्रेस मध्येही जोश पहायला मिळतो.
काँग्रेस महाराष्ट्र राज्यात राष्ट्रवादी (शरद पवार)शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा सोबत लढणार आहे. त्यामुळे विविध सर्व्हे मध्ये काँग्रेस (महा विकास आघाडी/इंडिया)जास्त जागा मिळतील असा अंदाज असल्याने काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याकडे विशेष लक्ष दिसते आहे.म्हणूनच राज्याच्या नव्या प्रभारी रमेश यांनी सर्व स्थानिक नेत्याची भेट तर घेतलीच शिवाय राष्ट्रीय आदिवासी काँग्रेस व राज्यातील आदिवासी काँग्रेस प्रमुखांची भेट घेऊन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल एक तास चर्चा केली त्यात आदिवासी बहुल मतदार असलेल्या लोकसभा जागेंसाठी विशेष रननीती आखण्यात आल्याची चर्चा आहे.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी . रमेश चेनिथला व आदिवासी काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी मुंबई येथे आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड शिवाजीराव मोघे साहेब यांची सदिच्छा भेट घेतली
मुंबईत झालेल्या या बैठकीमुळे काँग्रेस मध्ये पुन्हा वाशिम-यवतमाळ लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव मोघे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली.
