भारत जोडो न्याय यात्रेचा आज शुभारंभ होत असून आजच्याच दिवस पाहून माजी खासदार मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघातून २ वेला खासदार होते त्यांचे वडील स्व.मुरली देवरा हे सुद्धा येथून खासदार होते.
ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मिलिंद देवरा यांनी लिहिले की, ‘आज ते त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा अध्याय संपवत आहेत. मी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी असलेले ५५ वर्षांचे नातेही संपवत आहे. इतक्या वर्षांच्या पाठिंब्याबद्दल मी सर्व नेते, सहकारी आणि पक्ष कार्यकर्त्यांचा आभारी आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करू शकतात कारण दक्षिण मुंबईत ही जागा एकनाथ शिंदे गटाला सुटण्याची श्यक्यता आहे.
