नेता असावा तर असा
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची आष्टा गावाला भेट,
माहूर :- अमजद खान
माहूर तालुक्यातील मौजे आष्टा येथील पत्रकार तथा रि, पा, ई, आठवले गटाचे कट्टर कार्यकर्ते भीमराव पुनवटकर यांचे बहिणीच्या अंत्यविधीला जात असतांना यवतमाळ जिल्यातील आंबोडा गावा जवळ अपघाती निधन झाले होते, आपल्या अगदी जवळच्या व अत्यंत विश्वासू कार्यकर्त्याच्या अपघाती निधनाची बातमी मिळाल्याने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले हे मंगळवार दि,१६ जानेवारी रोजी सकाळी १० वा, च्या दरम्यान माहूर तालुक्यातील मौजे आष्टा येथे जाऊन दिवंगत पत्रकार भीमराव पुनवटकर यांच्या
परिवाराला भेट देऊन सांत्वन केले ,यावेळी कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी चे आश्वासन देऊन एक लाख रुपयाचा धनादेश पुनवटकर यांच्या पत्नीकडे सुपूर्द केला, व दिवंगत भीमराव पुनवटकर यांना श्रद्धांजली अर्पण केली,
यावेळी रि, पा, ई, आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक दलितमित्र मा, विजयदादा सोनावणे, नांदेड महानगराध्यक्ष धम्मपाल धुताडे, दिगंबर वाघमारे, महिंद्रा मानकर, समाज कल्याण विस्तार अधिकारी मोरे, समाज कल्याण अधिकारी दवणे, आष्टा गावाचे प्रतिष्ठित नागरिक मा, बाबारावजी केशवे, महाराष्ट्र डॉक्टर सेल, राज्यध्यक्ष डॉ, निरंजनजी केशवे, सिद्धार्थ तामगाडगे, अशोक सोळंके, केशव भगत, प्रकाश गायकवाड, रफिकभाई गाईड, दीपक कांबळे, रविद्र गायकवाड, अमोल गायकवाड, विजय खरे,दत्ता कांबळे, धनिक शेंडे, यांचे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी माहूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक डॉ, काशीकर तसेच सिंदखेड पोलिस स्टेशनं चे स, पो, नि, सुशांत कीनगे यांनी आपल्या फोजफाट्या सह चोख बंदोबस्त ठेवला होता,