लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल रुई येथे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
लेट अल्ताफ अली काझी प्रायमरी इंग्लिश मेडीयम स्कुल रुई येथे आज दिनांक ५/२/२०२४ सोमवार रोजी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जी. प. सदस्यां सौं रेनुताई शिंदे पाटील होत्या तर उदघाटक म्हणून संजय पाटील शिंदे,प्रमुख उपस्थिती उपसरपंच गजानन भाऊ डोमाळे, प्रा. चेतन राठोड सर,पत्रकार सुशिलजी करनेवार,शाळेचे अद्यक्ष जावेद अली काझी,पोलीस पाटील शाम भगत,इमदादअली काझी,संतोष भाऊ काळे, बाळूभाऊ राठोड,अपूर्व भाऊ राठोड,गजानन भाऊ दुधाट,सुनील भाऊ राऊत, जगदीश भाऊ मडावी,जागेश्वर साखरकर उपस्थित होते. सर्व प्रथम सौं रेनुताई संजय शिंदे पाटील आणि प्रमुख उपस्थितानच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हर अर्पण करून उदघाटन करण्यात आले.त्यांनतर स्वागत समारंभ चा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौं रेनुताई शिंदे पाटील यांचा सत्कार शाळेच्या शिक्षिका कु. रीना केवट मॅडम यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आले तर संजय पाटील शिंदे यांचा सत्कार शाळेचे अद्यक्ष तथा मुख्याध्यापक जावेद अली काझी सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला तसेच प्रमुख पाहुणे गजानन भाऊ डोमाळे यांचा सत्कार मुख्याध्यापक जावेद अली काझी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला पत्रकार करनेवार यांचे स्वागत शेख राजिक यांनी केले प्रा चेतन राठोड सर यांचे स्वागत सय्यद अनिस ने केले तर सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत झाल्यानंतर जगदीश भाऊ मडावी यांनी शाळेला भेट म्हणून क्रांतिसूर्य वीर बिरसा मुंडा यांची प्रतिमा म्हणून भेट दिली.प्रस्ताविक प्रा चेतन राठोड यांनी करताना लेट अल्ताफ अली काझी यांनी 15 वर्ष सरपंच असताना लोकांपयोगाचे आणि खूप चांगले काम केले म्हणून ते लोकांच्या गळ्यातले ताईत आणि आवडते नेते झाले परंतु कालांतराने हे काम करीत असताना अपल्याला हा जीवाभावाचा माणूस सोडून कायमचा निघून गेला त्या नतर त्यांचे पुतणे जुनेद अली काझी यांनी आपल्या काकाच्या पावलावर पाऊल ठेवीत त्यांच्या आठवणीत चांगल्या कामाच्या उद्देशाने त्यांचे नाव अजरामर राहावे म्हणून ग्रामीण भागातील गरीब मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून इंग्लिश स्कुल उघडली जुनेद अली काझी यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य पाहता आणि लोकांसाठी धावणारा, धडपड करणारा जनसेवक म्हणून त्याना लोक त्यांच्या बद्दल असे उदगार काढू लागले मरावे परी किती रूपे उरावे सर्व काही सुरळीत असताना कोरोना या भयंकर बिमारीत असा जनसेवक अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाचा आपला माणूस हे जग सोडून निघून गेला परंतु त्यांचे शैक्षणिक कार्य आणि उघडलेली शाळा नेहमी चालावी व त्यांचे नाव अजरामर राहावे त्यासाठी या सर्व शाळेची जबाबदारी त्यांचे लहान बंधू जावेद अली काझी आपल्या मोठ्या भावाच्या पाऊल्यावर पाऊल देत हे शैक्षणिक कार्य खूप चांगल्या प्रकारे करून शाळेला प्रगतीवर नक्कीच नेणार अशा प्रकारे आपले प्रास्ताविकेला विराम दिला. तसेच अध्यक्षीय भाषणातुन सौं रेनुताई शिंदे पाटील यांनी शाळेप्रति समाधान व्यक्त करीत ग्रामीण भागातील लोकांना इंग्रजी शिक्षणाचे महत्व पटवून दिले आणि स्वर्गीय जुनेद अली काझी यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. त्या नंतर विध्यार्थांनी बहारदार शेतकरी नृत्य सादर करून प्रमुख पाहुणे आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवीत लोकांचे डोळ्याचे पारणें फेडले कार्यक्रमचे नियोजन पाहून सौं रेनुताई शिंदे पाटील यांनी शाळेचे आणि शाळेच्या सर्व शिक्षक, विध्यार्थी यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका नम्रता केवट मॅडम, सहाय्यक शिक्षक दिनेश गायकवाड सर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे अद्यक्ष तथा मुख्याध्यापक जावेद अली काझी सर, सहाय्यक शिक्षिका रीना केवट मॅडम, सानिया सय्यद मॅडम, साईमा सय्यद मॅडम तसेच शिक्षेत्तर कर्मचारी संध्याताई मोहळे, शेख राजिक, शेख अजहर, अनिस सय्यद तसेच पालकवर्ग मित्रमंडळ व गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले.
