7k Network

राष्ट्रसंतांच्या विचारांची समाजाला गरज:ठाणेदार केशव ठाकरे

आजच्या स्थितीत समाजात सर्व धर्म समभाव, ग्राम विकास, व्यसनमुक्त समाज निर्मिती साठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार होणे व त्यांच्या ग्राम गीतेतील विचारांचे अनुकरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन
आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक केशवराव ठाकरे यांनी केले.
आर्णी च्या बाबा कंबलपोष उर्स मध्ये भव्य खंजिरी भजन स्पर्धेच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उदघाटक म्हणून त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

बाबा कम्बलपोष र. अ. उर्स शरीफ मध्ये ‘भव्य खंजेरी भजन स्पर्धा”दिनांक ८/२/२०२४ रोजी सकाळी ११वाजता आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब केशव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी रियाज बेग, मुजीब शेख ,शब्बीर भाई, दत्ता मार्कंड, गणेश मोरे, विनोद आक्कावार, बालपांडे सर व इतर गुरुदेव भजनी मंडळ उपस्थित होते .सदर स्पर्धेमध्ये एकूण २४ मंडळांनी सहभाग घेतला त्यापैकी
प्रथम क्रमांक: आदर्श भजन मंडळ,निमगव्हाण
त्द्वितीय क्रमांक : राष्ट्रसंत भजन मंडळ ,जनुना
तृतीय क्रमांक : महाराणा भजन मंडळ ,यवतमाळ
चतुर्थ क्रमांक : गुरुदेव सेवा मंडळ, घाटंजी
पाचवा क्रमांक: दत्तकृपा भजनी मंडळ ,खोपडी (खुर्द) सहावा क्रमांक: बिरबलनाथ भजन मंडळ, गिंभा
सातवा क्रमांक : गुरुदत्त भजन मंडळ,जवळा
आठवा क्रमांक : संत गजानन भजन मंडळ, साकुर
नववा क्रमांक: संत गजानन महाराज भजन मंडळ ,शेंदुरसणी ब.
दहावा क्रमांक : बालभजन मंडळ ,लोणी
अकरावा क्रमांक : संत गोसावी महाराज भजन मंडळ, करमाळा
बारावा क्रमांक : गुरुदेव सेवा मंडळ, साजेगाव
तेरावा क्रमांक: मनू स्वामी भजन मंडळ कुर्हा ,
१४ क्रमांक ; मुंगसाजी महाराज भजन मंडळ, केळझरा (कोमटी)
पंधरावा क्रमांक : गुरुदेव सेवा भजन मंडळ, निंबा इजारा
उत्कृष्ट गायक: पूर्णाजी खानोदे ,आदर्श भजनी मंडळ निमगव्हाण
उत्कृष्ट तबलावादक :अभिषेक लोखंडे ,राष्ट्रसंत भजन मंडळ, जनुना
उत्कृष्ट हार्मोनियम वादक : सुनील येडस्कर,,आदर्श भजनी मंडळ, निमगव्हाण
उत्कृष्ट खंजेरी वादक : पांडुरंग मेश्राम, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, घाटंजी यांना मिळाले
या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून प्राध्यापक जितेंद्र जुनगरे सर, श्री प्रशांत खाडे सर ,श्री प्रकाश दाभाडकर , सुरेश निशाणे यांनी काम पाहिले सहभागी सर्व मंडळास व क्रमांक प्राप्त मंडळास बाबा कम्बलपोष र. अ. दर्गा ट्रस्टच्या वतीने सन्मानपत्र व बक्षीस प्रदान करण्यात आले . बक्षीस समारंभासाठी अब्दुल मुजीब शेख , ईर्शाद सय्यद, सुनील झुणझुणवाला ,समद सय्यद, सय्यद रोशन, फैजान मलनस, दत्ता मार्कंड, गणेश मोरे ,आकाश आक्कावार,,इरफान भाई ,मुन्ना सरकार व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. साउंड सिस्टीम वसिउल्ला खान, अप्सरा मंडप यांची होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदना घेऊन करण्यात आली.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!