लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजप ने कंबर कसली असून २०२४ च्या निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली आहे यात वारांशीतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा रिंगणात उतरणार आहेत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे, तर गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे
मात्र पहिल्या यादीत महाराष्ट्र राज्यातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही कारण येथे अजूनही महा युतीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही.