आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी पालक वाटेल ती तडजोड करतात अन जिल्ह्याच्या ठिकाणी शाळा विद्यालयात प्रवेश मिळवतात पण आर्णीत देखील उत्तम आणि सर्वोत्तम शिक्षण आहे हे आजच्या दहावीच्या निकालाने सिद्ध झाले आहे आर्णी येथील गांधीनगर भारती शाळे ची विध्यार्थीनी कु.श्रेया वानखडे हिने जिल्ह्यातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे.तर दुसरी कडे उत्कृष्ट शिक्षण देऊन शाळेचा १००% निकाल देण्याची परंपरा संस्था चालक प्रमोद बुब यांच्या मार्गदर्शनात नारायणलिला इंग्लिश मिडीयम स्कुल ने कायम राखली आहे
जिल्ह्याच्या ठिकाणा पेक्षा हम भी कूछ कम नही हे येथे पहायला मिळाले…
गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयात कु. मानसी धोपरे हिने १०० पैकी १०० गुण मिळवले.
तर नारायण लीला च्या कु.अग्रणी प्रदीप राठोड हिने गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले
अरफिया मिर्झा हिने विज्ञान या विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले.
हे थक्क करणारे यश जसे विद्यार्थ्यांचे आहे त्यांच्या कठोर परिश्रमा चे आहे तसे त्यांच्या पालकांच्या चिकाटी चे व संस्था चालक प्रमोद बुब यांच्या मार्गदर्शनाचे आहे. आणि सर्व शिक्षकांचे आहे जे वर्ष भर विद्यार्थी घडविण्या चे बहुमूल्य काम करतात.