एक धडाडीचा कार्यकुशल संवेदनशील नेता म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड यांची ओळख आहे चोवीस तास जनसेवेची भावना घेऊन काम करणारा माणुसकीचा माणूस म्हणून या अजय नेतृत्वाची ओळख आहे आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या संवेदनशीलतेचा परिचय झाला त्यांनी तो अनुभवला अन आता तालुक्यातील शेतकरी ना.संजय भाऊ राठोड यांनी धन्यवाद म्हणत आभार मानत आहेत.
आर्णी दिग्रस तालुक्यातील पिके पाण्या वाचून सुखत आहेत त्या पिकांना संजीवनी देण्याचे काम एक पाणी करू शकत होते मात्र अरुणावती प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी बंद झाले होते त्या मुळे जनावरांना हिरवा चाराही मिळेनासा झाला ही परिस्थिती पाहून शिवसेना उपजिल्हा प्रमुख विष्णू उकंडे यांनी शेतकऱ्यांच्या भावना निवेदन देऊन कळवल्या
लगेच ही गंभीर बाब लक्षात घेऊन त्यांनी तातडीने पाटबंधारे विभागाचे अधिकारी जिल्हाधिकारी यांना पाणी कालव्यात सोडण्याचे आदेश दिले.
मे महिन्यात प्रकल्पाच्या राखीव जल साठा सोडण्यासाठी एक समिती असते त्या समितीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्या सर्वांनी आदेशावर सही केली अन अरुणावती प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याला एका अवर्तना साठी पाणी सोडले त्यामुळे मरणासन्न पिकास संजीवनी मिळाली कालव्यात सुटलेल्या पाण्याने विहिरी ची पातळी वाढली.
आनंदी झालेल्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनाच्या भावना पालकमंत्री संजू भाऊ पर्यंत पोहचव ल्या त्यामुळे डॉ.विष्णू उकंडे याचे आभार मानले तसेच शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव आर्णी शहर प्रमुख श्याम ठाकरे यांचेही आभार मानले
प्रमोद कुदळे