7k Network

आय पी एल २०२५ सहा संघ दावेदार,प्रत्येक सामना चुरशीचा

ऐन रंगात आलेले आयपीएल २०२५ चे सामने भारत पाक युद्धजन्य परिस्थिती मुळे स्थगित करण्यात आले होते. अनेक संघातील विदेशी खेळाडू मायदेशी परतले आता आयपीएल चे सामने पुन्हा सुरू होत आहेत

आयपीएल ही ट्राफि जिंकण्यासाठी एकूण सहा संघात चुरस पहायला मिळणार आहे.

सहा संघात स्पर्धा:

आता मुंबई इंडिअन सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका पाहूया…

स्थगिती उठल्या नंतर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे

आयपीएल स्पर्धेच्या सुधारित वेळापत्रकातील पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फेरले. हा सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सचा यंदाच्या हंगामातील प्रवास संपुष्टात आला आहे. एका बाजूला चार संघ बाहेर पडले असताना एकही संघासमोर Q अर्थात पात्र असल्याचा अधिकृत शिक्का उमटलेला दिसत नाही. गुणतालिकेत हे चित्र आघाडीच्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी यंदा तगडी स्पर्धा सुरु असल्याचे स्पष्ट होते.

 

रायल चॅलेंज बंगरुळू  ची संधी हुकली, आता कोणता संघ प्लेऑफ्ससाठी पहिल्यांदा ठरू शकेल पात्र

आता उर्वरित सामन्यात जो संघ पहिल्यांदा १८ गुण मिळवेल तो प्लेऑफ्ससाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरेल. पावसाच्या व्यत्ययामुळे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यामुळे रॉयल चॅलेंज बंगरुळू  ची संधी हुकली असून आता गुजरात टायटन्सकडे ती संधी आहे. इथं एक नजर टाकल्यास प्लेऑप्सच्या शर्यतीतील असलेल्या ६ संघांपैकी कुणाचा पेपर आहे एकदम सोपा अन् कोणत्या संघाला आहे सर्वाधिक धोका यासंदर्भातील माहिती पहाता येईल.

 

गुजरात समोर चे आव्हान तुलनेत सोपे..

११ सामन्यानंतर गुजरातच्या संघाच्या खात्यात १६ गुण जमा आहेत. उर्वरित तिन्ही सामन्यातील विजयासह हा संघ २२ गुणांपर्यंत पोहचू शकतो. अव्वलस्थानावर पोहचण्यासी संधी असलेल्या हा संघ १८ मार्चला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला भिडणार आहे. हा सामना जर त्यांनी जिंकला तर प्लेऑफ्ससाठी पात्र होणारा गुजरात टायटन्स हा पहिला संघ ठरेल. याशिवाय २२ मे रोजी ते लखनौ आणि २५ मे रोजी त्यांना चेन्नई सुपर किंग्जचा सामना करायचा आहे.

रॉयल चॅलेंज बंगरुळू वरच्या स्थानी मात्र…

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिल्यामुळे एका गुणासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १७ गुण मिळवत गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान झालाय. २३ मे रोजी त्यांना सनरायझर्स हैदराबाद आणि २७ मे रोजी ते लखनौ विरुद्ध खेळणार आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकून ते २१ गुणांपर्यंत पोहचू शकतात. पण जर यातला एक सामना गमावला तर त्यांचे टॉपला राहण्याचे स्वप्न अधूरे राहू शकते. हा विचार करण्याआधी ते एक सामना जिंकून ते प्लेऑफ्सचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्नशील असतील.

पंजाब किंग्जला ३ पैकी २ सामने जिंकावे लागतील

पंजाब किंग्जच्या संघाने ११ सामन्यात १५ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित ३ सामन्यातील विजयासह ते २१ गुणांपर्यंत पोहचू शकतात. त्यांचेही पहिले टार्गेट दोन सामने जिंकून १९ गुणांसह प्लेऑफ्सच तिकीट पक्के करण्याचे असेल. १८ मे रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ते प्लेऑफ्सच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. २४ मे रोजी ते दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध तर २६ मेला मुंबई विरुद्ध सामना खेळताना दिसतील. हे दोन्ही संघ प्लेऑफ्सच्या शर्यतीत असून त्यांच्यासाठी हे तगडे आव्हान असेल.

 

 

 

 

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!