आर्णी येथील कडवट शिवसैनिक व माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांचा सच्चा समर्थक सेवाभावी वृत्तीचा समाजसेवी फैयाज सैय्यद याचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
फैयाज याने जेव्हा आर्णी शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती तेव्हा माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार यांनी मोफत जलसेवा दिली होती आर्णी करांना पाणी पुरवण्याचे पवित्र काम बाळासाहेब करत होते तेव्हा या कार्यात फैयाज ची भूमिका महत्त्वाची होती. त्याने आपल्या घरी शहानूरी मोहल्ला येथे असलेल्या बोअर ने सर्वाना पाणीपुरवठा केला होता.
कोणीही संकटात मदतीला धावून जाणारा फैयाज म्हणजे “मूर्ती लहान कीर्ती महान’ असे व्यक्तिमत्त्व आहे. अरुणावती नदी स्वच्छता अभियानात त्याचा सिंहाचा वाटा होता.कोणी आजारी आहे,अपघातग्रस्त,व नैसर्गिक आपत्तीत तो हिरिरीने मदतीला धावून जातो.त्याचा शहरात मोठा मित्र परिवार आहे व तो शिवसेना उबाठा गटात शिवसैनिक म्हणून काम करतो.
आज त्याचा वाढदिवस मनोज ऑटोमोबाईल या प्रतिष्ठानात माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी उबाठा शिवसेना आर्णी चे शहर प्रमुख पंकज शिवरामवार,मनोज मुनगिनवार ,प्रमोद कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल जाधव ,पत्रकार परवेज बेग,रिझवान बेग,सोहेल चव्हाण, विनोद वायदंडे उपस्थित होते.
फैयाज सैय्यद यांचा कट्टर समर्थक असलेला शिवसैनिक विनोद वायदंडे याने त्याच्या तर्फे आर्णी ग्रामीण रुग्णालयात फळ व बिस्कीट रुग्णास वाटप केले.
आर्णी ग्रामीण रुग्णालयात
बोल महाराष्ट्र पोर्टल चे संपादक प्रमोद कुदळे , आर्णी पत्रकार संघाचे अद्यक्ष आबिद फानन,रजिक शेख, पब्लिक पोस्ट चे तालुका प्रतिनिधी रशीद मलनस, अमरावती दर्शन चे परवेज बेग,राष्ट्रवादी काँग्रेसचे सोहेल चव्हाण, विनोद वायदंडे आरिफ खान, आसिफ चव्हाण, फिरोज लोधी, एकनाथ गेलेवाड, गोपाल मांडूटे बिलाल शेख उपस्थित होते.त्यानंतर आर्णी येथील कोड्याचे प्रसिद्ध प्रतिष्ठान अंजली ड्रेसेस चे संचालक राजेश श्रीवास यांनी फैयाज यांचा भगवा शेला देऊन सत्कार केला.