मैदानावर पाऊस आला की क्रिकेट चा सामना एक तर रद्द होतो की वेळ झाला तर कमी ओव्हर चा सामना होतो त्यातही डक लूइस च्या नियमाने सामना होतो.जर सामना झालाच नाही तर प्रत्येक संघास समान गुण देण्यात येतात.
साधारण भारतात इंडियन प्रीमिअर लीग चे सामने उन्हाळ्यात खेळल्या जातात सामने दिवस रात्र खेळवल्या जात असल्याने उन्हाचा त्रास होत नाही.
पावसाळा लागण्या पूर्वी सामने संपतात तशा प्रकारे वेळापत्रक आखल्या जाते..मात्र यावेळी भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सामने स्थगित करण्यात आले होते मात्र हवामान खात्याने आता देशभर पाऊस सांगितल्याने भडतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवा नियम जाहीर केला असून आता पाऊस आला तरी सामना रद्द होणार नाही.
आयपीएल २०२५ च्या लीग टप्प्यातील उर्वरित ९ सामन्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात मान्सून पूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. अशातच कोणतेही उर्वरित सामने पावसामुळे रद्द होऊ नये, यासाठी BCCI कडून एक नवा नियम जारी करण्यात आला आहे. सध्या आयपीएल २०२५ चा शेवटचा टप्पा सुरू आहे. यादरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात BCCI स्पर्धेसाठी काही नवीन नियम जारी केले आहेत. आयपीएल २०२५ या स्पर्धेच्या पुढील सामन्यांसाठी अतिरिक्त २ तासांचा वेळ वाढवण्यात आला आहे. पावसाच्या शक्यतेमुळे हा बदल करण्यात आला आहे. १७ मे रोजी बेंगळुरू येथे होणारा आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. यानंतर BCCI कडून हा नवा नियम जारी करण्यात आला आहे. आयपीएलचा कोणताही सामना पावसामुळे रद्द झाल्यास पूर्ण २० षटकांचा सामना व्हावा यासाठी आयपीएलने अतिरिक्त १२० मिनिटे (२ तास) वेळ जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत हा अतिरिक्त वेळ फक्त प्लेऑफ सामन्यांसाठी ठेवण्यात येत होता.