7k Network

प्रसिद्धी चा हव्यास नसलेलसमाजसेवी युवा व्यक्तिमत्त्व यासीन लाला…!

आज सामाजिक असो वा राजकीय क्षेत्र सोशिअल मीडिया आल्या पासून प्रसिद्धीचा हव्यास अनेकांना जडला असल्याचे पहायला मिळते. एक दोन केळी अन पाच रुपयांचा बिस्कीट पुडा देऊन १०० फोटो काढणारे व लगेच फेसबुक व्हाट्स अप वर ढकलणारे खूप आहेत पण याला अपवाद असलेला तरुण म्हणजे यासिन लाला…

जगणे थोडे समाजासाठी या उक्ती प्रमाणे समाजाची सेवा करतांना कुठेही प्रकाश झोतात यायचे नाही प्रसिद्धी पासून दूर रहायचे असा हा युवा सामाजिक संवेदनशील व्यक्ती म्हणजे यासिन लाला त्याचा आज वाढदिवस त्या निमित्ताने बोल महाराष्ट्र कडून हार्दिक शुभेच्छा…!

यासिन याचे वाढदिवसा निमित्ताने युवा व्यावसायिक सोशिअल मीडिया यंग किंग शुभम डोल्हारकर याने शब्दबद्ध केलेल्या शुभेच्छा त्याच्या च शब्दात

अन्नसेवेचा महामेरू,
बहुत दुर्बलांशी आधारु,
अखंड सेवेचा निर्धारू,
कर्मयोगी..!

भाई आज तुझा वाढदिवस. जरी तुझा वाढदिवस ७ फेब्रुवारी असेल तरीही सर्वजण ५ जून हाच तुझा वाढदिवस म्हणून साजरा करतात.मी तर म्हणेन महिन्याच्या पाच आणि सात तारखेला जरी केला तरीही ते योग्य.

आज तुझा सुवर्ण काळ सुरू आहे परंतु तुझ्या कठीण काळालाही मी जवळून बघत आलो आहे,लहानपणापासूनच आपण एका एरियात राहून मोठे झालो तुझं तेव्हापासून क्षेत्र जरीही वेगळं असलं तरीही तुझी मेहनत आम्ही बघितली आहे.भिकुसेठ यांच्या काउंटर पासून तर शेतापर्यंत सगळी कामे तू केली आणि त्यातून बरेवाईट सगळे दिवस तू जेवढे बघितले तेवढे कोणीही बघितले नसेल. पैशांची किंमत काय असते पैशासाठी किती ठोकर खावी हे तुला चांगलं माहित.

कठीण काळानंतर चांगला काळ येतो असं म्हणतात बाबा कंबलपोष यांची कृपा झाली आणि तुझा चांगला काळ सुरू झाला.त्यातही तू पैसे कमावले पण माणुसकी सोडली नाही.

गावात अनेक धान्नसेठ आहेत पण एकाचीही औकात नाही की तुझ्याएवढ अन्नदान करण्याची.कोणीही गरजू आला की त्याला आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी करणे,कब्रस्तान असो किंवा स्मशानभूमी असो किंवा कोरोना काळातही तू केलेलं अन्नदान हे सगळं जे तू करत आहेस हे ईश्वरी कार्यच.

कित्येक वडिलांची अपेक्षा असते मुलीचं लग्न चांगलं व्हावं पण परिस्थिती आपल्याला साथ देत नाही अशा आपल्या बहिणींच्या लग्नाला तुझ्याकडे पैसे नसतानाही केलेली मदत थोर.खर पुण्य तू कमवत आहेस भाई .

तू नेहमी म्हणतो की शुभ्या, अपनेको ऊपर पैसे लेके थोडी जाणे का है.!
पण पैसा आला की जे लोक आपल्याला ओळखत नव्हते ते लोकही आता तुला नमस्कार घालतात हे मनाला आनंद देऊन जातो.

आज तुझा वाढदिवस तू भाई खूप मोठा हो, आणि असच पुण्य कमव बस बाकी तर बाबा कंबलपोष आहेतच तुझ्या सोबत.!

“जिस्म मे जान पडे रुह को तस्किन मिले,
आपसे सुनने को जो सूर ए “यासीन” मिले.!

कुराण शरीफ ३६ व्या अध्यायात सूर ए यासीन उल्लेख सापडतो, तुझं नावाप्रमाणेच तुझं काम यासीन म्हणजे ” अल्लाह की कृपा” खरंच तुझ्यावर ती कृपा आहे आणि सदैव राहो.!

हॅप्पी बर्थडे लाला भाई ❤️

शुभम

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!