7k Network

फळ लागवडीत पेरू लागवडी कडे शेतकऱ्यांचा कल…!

कापूस,सोयाबीन तूर उडीद,मुंग असे पिके निसर्गाच्या अवकृपे मुळे व निश्चित बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी आता फळझाडे लागवडी कडे वळत आहेत.

उसाच्या साठी लागणारे भरपूर पाणी जमिनीची सुपिकता लागते पण आता नव्या संकरित फळ झाड लागवडीसाठी हलक्या ते मध्यम जमिनीत व कमी सिंचनाचा प्रश्न पहाता शेतकरी वर्ग फळझाड लागवडी कडे वळू लागला आहे.शिवाय शासन देखील यासाठी प्रोत्साहन देते. आता विदर्भातील शेतीत देखील आंबा, फणस, चिकू,द्राक्ष,संत्रा डाळिंब,मोसंबी,आवळा लागवडी कडे वळत आहेत.त्यात आता अनेक फळे बारमाही येतात सोबत बोर लिंबू सीताफळ देखील लागवड सोबत ड्रॅगनफ्रुट चेरी बेरी देखील लागवड होत आहे पपई देखील मोठया प्रमाणावर लागवड वाढली आहे.

मात्र सर्वांच्या आवडीचे व टिकाऊ फळ म्हणजे पेरू जांब पीक तैवान ही जात  सद्या लोकप्रिय होत असिन बाजारमूल्य मिळत असल्याने पेरू लागवडीसाठी तरुण शेतकरी वळत आहेत.

उच्चशिक्षित तरुण आता नोकरीच्या मागे न लागता शेती करता दिसून येत आहेत. पारंपरिक पिकांना फाटा मारत आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करत अनेक जण ड्रॅगन फ्रूट, पेरूसह अनेक फळपिकांतून चांगली कमाई करताना दिसत आहेत. करमाळा तालुक्यातील अशाच एका उच्चशिक्षीत जगदाळे दांपत्यानं शेतकऱ्यानं शिक्षण असूनही नोकरीच्या मागे न धावता शेतीची कास धरली आहे. अवघ्या दीड एकरावर तैवान पेरूची लागवड करत पहिल्याच वर्षी त्यांनी २४ लाखाहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.

आता आधुनिक तंत्रज्ञान वापरून भरगोस उत्पन्न शेतकरी घेत आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत लाखोंचे उत्पन्न

फळबाग लागवडीतून आर्थिक प्रगती साधली आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत तैवान पेरूचे अवघ्या दीड एकरात 1550 रोपं लावत वर्षाकाठी २४ लाखांहून अधिक उत्पन्न कमावलं आहे. दीड एकरातून ३६ टन उत्पादन मिळाले असून त्यांना पेरूच्या लागवडीपासून तर विक्रीपर्यंत संपूर्ण खर्च पाच लाख पन्नास हजार रुपये इतका आला. जगदाळे यांना दीड एकर क्षेत्रातून तब्बल 36 टन पेरूचे उत्पादन मिळाले व त्यातून 24 लाख 20 हजार रुपयांचा आर्थिक फायदा त्यांना झाला.

तैवान पेरूला ठिबक सिंचनातून पुरवलं पाणी

करमाळ्यातील वाशिंबे गावचं हे दाम्पत्य आहे. उच्चशिक्षित शेतकरी विजय जगदाळे आणि त्यांची पत्नी प्रियंका जगदाळे यांनी पारंपरिक शेतीऐवजी पेरू लागवड करण्याचा निर्णय घेतला. मार्च २०२३ मध्ये १५५० तैवान पिंक पेरूच्या जातीच्या रोपांची लागवड दीड एकर क्षेत्रामध्ये केली. तैवान पेरूचं उत्पादन घेत त्यांनी पेरू उत्पादनात वाढ करण्याचाही प्रयत्न केला आहे. देशी गायीच्या शेणासह सेंद्रिय खतांचा वापर करत ठिबकच्या सहाय्याने पाणीपुरवठा करत पेरूतून उत्पन्न काढलं आहे.

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!