7k Network

सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण, पत्रकाराचा आत्मदहनाचा इशारा…!

गावात पहिलेच रहदारी चे रस्ते अरुंद असतात त्यात काही नागरिक कुणालाही न जुमानता रस्त्यावर अतिक्रमण करतात त्यामुळे इतर गावकरी नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.

आर्णी तालुक्यातील महाळुंगी या गावात सार्वजनिक रसर्यावरील अतिक्रमण काढावे अन्यथा येत्या स्वातंत्र्यदिनी १५ औगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा गावातील रहवासी नागरिक व पत्रकार मुरलीधर राठोड यांनी निवेदनातून दिला आहे.

*📰 रस्त्यावर अतिक्रमण, प्रशासन शांत – आत्मदहनाचा इशारा चर्चेत मुरली राठोड पत्रकार*

महाळुंगी, ता. आर्णी, जि. यवतमाळ | दिनांक: ३१ जुलै २०२५

गावातील सामान्य नागरिकांच्या मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण होऊनही स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची गंभीर बाब महाळुंगी येथे समोर आली आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्यावर करमसिंग दुलसिंग चव्हाण यांनी अतिक्रमण करून तो पूर्णपणे बंद केला आहे. विशेष म्हणजे, या रस्त्यावर त्यांनी घर देखील उभारले आहे. हे अतिक्रमण गेल्या अनेक महिन्यांपासून ग्रामस्थांसाठी मोठा त्रास ठरत आहे.

स्थानिक रहिवासी मुरली रामप्रकाश राठोड यांनी दिनांक १०/०१/२०२४ रोजी ग्रामपंचायतीकडे तक्रार सादर केली होती. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे त्यांनी पुन्हा पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी तक्रार देत रस्ता त्वरित मोकळा करण्याची मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिव अजूनही या प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाची निष्क्रियता स्पष्टपणे समोर येते.

“सामान्य जनतेचा आवाज दडपला जाऊ नये म्हणून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहे. असे मुरली राठोड म्हणतात.तथापि, जर १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत संबंधित अतिक्रमण हटवले गेले नाही, तर मी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे. यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार आणि दोषी राहील,” असे मि मुरली रामप्रकाश राठोड ठामपणे जग जाहीर सांगत आहे.असा इशारा त्यांनी दिला आहे.

 

प्रश्न अजूनही अनुत्तरित – रस्ता केव्हा मोकळा होणार?

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता ग्रामस्थांनी एकत्र येणे अत्यावश्यक झाले आहे. अशा भावना देखील मुरली राठोड यांनी व्यक्त केल्या.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!