आम्ही हिंदू आहोत गणपती आमचा देव आहे पण धर्मा च्या नावावर आमची अडवणूक कशासाठी असा सवाल मराठा अरक्षणाचे योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी केला.
आम्ही आमच्या सणाला गालबोट लावण्याचा स्वप्नात देखील विचार करू शकत नाही.हिंदू सना चे निमित्त पुढे करून आमची अडवणूक आम्ही सहन करू शकत नाही.ज्यांचा हिंदुत्वा सोबत देणंघेणं नाही असे लोक आम्हाला धर्म शिकवत आहेत असेही मनोज पाटील म्हणाले.
न्यायालय आम्हाला न्याय देईल आमचा विश्वास आहे.माझ्या समाजा साठी मी बलिदान द्यायला तयार आहे पण तुम्ही आत्महत्या करू नका असे आवाहन देखील मनोज पाटील जरांगे यांनी केले.
तुम्ही फक्त शांततेत मुंबईला या आपण गादीवर छत्रपती शिवाजी महाराज व गणेशा ची मूर्ती घेऊन जाऊ आता हटवायचे नाही असा निर्धार मनोज पाटील जरांगे यांनी केले.
सर्व पक्षातील खासदार, आमदार,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कारखाना पदाधिकारी सर्व राजकिय पक्षाचे प्रमुख यांनी आता या आंदोलनास पाठिंबा द्यावा ही समाजाच्या सेवेची संधी आहे यावेळी जर तुम्ही मदत केली नाही तर समाज तुम्हाला माफ करणार नाही. जर तुम्ही साथ दिली तर समाज तुमचे सहकार्य विसरणार नाही असेही मनोज पाटील जरांगे म्हणाले
मुंबईत होणाऱ्या आंदोलना वर बारकाईने लक्ष ठेवा शांततेत मुंबई चला कायदेशीर बाबी पाळून आपण मुंबईत आंदोलन करू म्हणजे करू सगळ्या पक्षातील मराठा नेत्यांची या आंदोलना ला साथ हवी असेही ते म्हणाले.
आपण ग्रामीण शैलीत बोललो कोणाच्याही आई विषयी बोललो नाही.चुकून तसे कोणाला वाटले असले तर मी शब्द मागे घेतला आहे असेही पाटील यांनी स्पस्ट केले
आज छत्रपती शिवराय पूजन व गणपती ची आरती करून मनोज पाटील मुंबई कडे कूच करणार आहेत.
लाखो मराठा बांधव मुंबईत येतील असा अंदाज आहे.
