गरजवंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढत गेली दोन वर्षे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळावे म्हणून क्रांतिकारक लढा देणारे संघर्स योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज मुंबईत आंदोलन करणार आहे मनोज पाटील हे आंदोलनावर ठाम असून आज अंतरवली सराटी येथून मराठा समाजाचे वादळ मुंबई च्या दिशेने निघाले आहे.मात्र मुंबईत मोठया प्रमाणात गणेश उत्सव साजरा होतो त्यामुळे मराठा समाजाला मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी सरकार चा प्रयत्न असून
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार ने नुकतीच मराठा आरक्षण उपसमिती बद्दलवली आहे नवे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महा युती सरकार चे एक प्रतिनिधी मंडळ मराठा आंदोलक मनोज पाटील यांची भेट घेणार आहे.या भेटी कडे मुंबई सोबत पूर्ण राज्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.
