संदीप ढाकुलकर
“मंगलदास बांदल यांनी घेतली शरद पवार यांची भेट पुणे जिल्ह्यात चर्चेला उधान,,
पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी शरद पवार यांची काल भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचे चिन्ह आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे राजकारणात जादूचे एक्का मानल्या जातात. यापूर्वीसुद्धा त्यांनी अनेक घडामोडी केले आहे पुणे जिल्ह्यात त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. मागील लोकसभेला त्यांनी खासदार अमोल कोल्हे चा प्रचार करत विजय मिळवून आणला होता. निवडणुकीनंतर काहीच दिवसात त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आणि त्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. बाहेर आल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे यातच काल त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेक दिग्गजांच्या भुवया उंचावल्या आहे. शरद पवारांनी बांदल यांच्या भेटीमुळे बांदल नेमके राजकारणात काय धांदल उडवतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
