केवळ भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द न पाळल्याचा ठपका ठेऊन महाराष्ट्रात अभद्र युती ची मुहूर्त मेंढ कशी रोवल्या गेली हे सगळ्यांना माहीत आहे.
आधी नकार देणाऱ्या श्रीमती सोनिया गांधी यांना कन्व्हेंस करण्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतला तुम्हाला मुख्यमंत्री करण्यासाठी ते का एव्हढे झटले ते तेव्हाच तुमच्या लक्षात यायला हवे होते महाविकास आघाडी झाल्यावर तिचे लंगडे समर्थन झाले जरूर पण अडीच वर्षा नंतर तीन टप्प्यात शिवसेना आमदार सोडून जात होते मात्र गेले ते कावळे म्हणून मीच कसा शिवसेना प्रमुखां सीबत काम केलेला आहो हे दसखवण्यातनरकातल्या स्वर्गाने दाखवले तेच कसे शरद पवार यांच्या संपर्कात होते कारण जगजाहीर आहे त्यांना मुख्यमंत्री व्हायचे होते.पण तुम्हाला मुख्यमंत्री करून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्हाला व शिवसेनेला फिटवायचे होते आता असे वाटते आता तुम्ही काँग्रेस व राष्ट्रवादी मुस्लिम धार्जिनी आहे हा आरोप करू शकत नाही,
एकनाथ शिंदे यांना गद्दार व खोके खोके म्हणण्या पलीकडे तुम्ही पहिलेच नाही उलट यसपूर्वी इतिहासात छगन भुजबळ,नारायण राणे राज ठाकरे शिवसेना सोडून गेले होतेच पण तेव्हा स्व.हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होते ते नाऱ्या व लखोबा म्हणत.
आज राणे चे दोन मुले आमदार झाले निलेश राणे तर रोज खालच्या पातळीवर टीका करतो त्याला एकही मोठा नेता आक्रमक उत्तर देत नाहीत आमदार गेले तुम्ही म्हणाले मी पक्ष पुन्हा उभा करेन पण तसे झाले नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकांचे सोडून जाणे सुरू झाले पण तुम्ही कोणाच्या भरवशावर पक्ष पुन्हा उभा करणार हा प्रश्न आहे सकाळच्या पत्रकार परिषदेचा राज्यभर हशा होत आहे हे तुम्हाला सांगणारे कोणी नाही का तुम्ही ज्यांना विरोध करता ते शिवसेना एकनाथ शिंदे गट सत्तेतून मातब्बर झाला आहे.साधन संपत्ती ला तिथे काहीच उणे नाही
तुम्ही भाजप वर टीका करता पण भाजप आज तुमच्या पेक्षा कोसो दूर पोहचली आहे हे तुम्ही मान्य का करत नाही विश्व प्रवक्ता काय करतो आहे पक्ष वाढीसाठी..?तुम्ही त्यांना का विचारत नाही
कधी काळी सुषमा ताई ज्या बोलत होत्या आज त्या कट्टर शिवसैनिक बनल्या आहेत.
तुम्ही मातोश्री वर एका प्रवेशा साठी भाषण करता ते बरे वाटत नाही पण तुम्हाला हे सांगणार कोण तुम्हाला साद दडणार्या राज ठाकरेंना तुम्ही का बोलत नाही ती तुमचा भाऊ आहे शत्रू नाही हे तुम्हाला कोण सांगणार..?राष्ट्रवादी काँग्रेस एक होणार आहे मग शरद पवार साहेब व महा विकास आघाडी चे काय?शिवसेना उबाठा सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले कमीत कमी शिवसैनिक तरी रहातील पण काल १५०० सदस्यांनी पक्ष सोडला व ते भासप मध्ये गेले आता ते जय भवानी जय शिवाजी च्या जागी जय श्रीराम चे नारे लावतील त्याबद्दल वाद नाही राम आमचे आराध्य आहेच पण पक्षाला शिवसैनिक अखेरचा जय महाराष्ट्र का करत आहेत हे तुम्ही विचार करून ठरवा…झाले ते पुरे झाले आता तरी डोळे उघडा साहेब अशी आर्त हाक शिवसैनिक मारताना दिसत आहे.
अशातच भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष प्रणित कामगार संघटनेतील दीड हजार सदस्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा मोठा हादरा मानला जात आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक कार्यपद्धतीमुळे अनेक जण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यामुळे प्रवेश करणाऱ्यांचे एक प्रकारे बुकिंग सुरू झाला आहे असं विधान कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे. येत्या काळात कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटप्रमुख शारंगधर देशमुख यांच्यासह अनेक जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. देशमुख हे काँग्रेसमधील अनेकांना घेऊन शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने क्षीरसागर यांच्या वक्तव्याला महत्त्व आले आहे.